Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed : टॉवर कोसळला अन् डाव मोडला; चोरी करताना दोघांचा दुर्दैवी मृत्यू; नेमकं काय घडलं?

Beed News : बीडच्या केज तालुक्यात हाय व्होल्टेज टॉवरवर चढून तार चोरी करताना दोन चोरट्यांचा मृत्यू झाला. साथीदारांनी अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस तपासात सत्य समोर आले.

Alisha Khedekar

केज तालुक्यात टॉवरवर चढून तार चोरी करताना दोन जणांचा मृत्यू

टॉवर कोसळल्याने घटना घडली

साथीदारांनी अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न

पोलिस तपासात प्रकरण उघडकीस

बीडच्या केज तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. केजमध्ये उभारण्यात आलेल्या हाय व्होल्टेज टॉवरवर चढून तार चोरीचा प्रयत्न करताना दोन चोरट्यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर या चोरट्यांच्या टोळीतील इतर सदस्यांनी रस्ते अपघाताचा बनाव केला. मात्र चोरी कधीच लपून राहत नाही म्हणतात ते अगदी खरं आहे. चोरट्यांचा डाव फसला आणि मृत झालेल्या दोघांच्या मृत्यू मागचं कारण समोर आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश पाटोळे आणि आकाश आडे अशी मृत्यू झालेल्या दोन चोरट्यांची नावे आहेत. अविनाश पाटोळे, आकाश आडे आणि त्यांचे साथीदार आकाश पेठे, दीपक भगत व वैभव आदत यांच्यासह पुणे येथून केज तालुक्यात आले होते. त्या ठिकाणी नांदूर घाट शिवारात असलेल्या हाय व्होल्टेज टॉवरवर त्यांची नजर गेली. या टॉवरवर चढून त्यांनी तार चोरी करण्याचा प्लॅन केला. प्लॅननुसार अविनाश पाटोळे आणि आकाश आडे टॉवरवर चढले.

त्याचवेळी टॉवर कोसळल्याने अविनाश पाटोळे आणि आकाश आडे या दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर इतर साथीदारांनी त्या दोघांचे मृतदेह एका कारमध्ये टाकून परभणीकडे पळ काढला. त्या ठिकाणी इतर साथीदारांनी हे मृतदेह गाडीतच सोडून पलायन केले.

यानंतर गाडीच्या चालकाने हे मृतदेह ॲम्बुलन्सच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले आणि चोरट्यांचा डाव मोडला. मृतांच्या नातेवाईकांना ही बाब समजल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. दरम्यान यानंतर परभणी व केज पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT