सहारनपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर हत्या
आरोपी नात्यातील व्यक्ती
आरोपीला पोलिसांकडून अटक
मुलींच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्न
Uttar Pradesh Sahanpur Rape News उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी हा मुलीच्या सख्ख्या मावशीचा नवरा असल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव टिपू असे आहे. २३ मार्च रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास टिपूने बायकोच्या बहिणीच्या १५ वर्षीय मुलीला घरातून खोट सांगून घेऊन गेला. पीडित मुलगी देखील विश्वास ठेवून टिपूसोबत घराबाहेर पडली. त्यानंतर टिपूने निर्जनस्थळी नेवून तिच्यावर क्रूरपणे बलात्कार केला. पीडितेने नकार दिल्यानंतर सुद्धा नराधम आरोपी थांबला नाही.
दरम्यान मुलगी घरी सांगेल या भीतीपोटी नराधमाने तिच्यावर क्रूर हल्ला केला. या हल्ल्यात पीडित मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुलगी अचानक घरातून बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुलीचा मागोवा घेतला. पोलिसांना तपासादरम्यान मुलीचा मृतदेह एका झुडपात नको त्या अवस्थेत आढळला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.