Bee sting students Tribal school incident Nandurbar 
महाराष्ट्र

Nandurbar : मधमाशांचा विद्यार्थ्यांवर हल्ला, १३ जण, जखमी मळमळ आणि उलट्यांचा त्रास

Bee sting students Tribal school incident Nandurbar : नवापूर तालुक्यातील बंधारे येथील आदिवासी आश्रमशाळेत मधमाशांनी हल्ला केला. १३ विद्यार्थी जखमी झाले असून काहींना उलटी आणि मळमळीचा त्रास जाणवत आहे.

Namdeo Kumbhar

सागर निकवाडे, नंदुरबार प्रतिनिधी

Nandurbar Latest News : नंदुरबारमध्ये आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांवर मधमाशांनी अचानक हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली. शाळेतील मैदानात विद्यार्थी खेळत होते, त्याचवेळी मधमाशांच्या थव्याने हल्ला केला. मधमाशाने हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली, विद्यार्थी सैरावैरा धावू लागले. जखमी विद्यार्थ्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मधमाशा चावल्यानंतर काही जणांना उलट्याचा त्रास होत होता. नवापूर तालुक्यातील बंधारे येथे आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शासकिय आश्रम शाळेत मधमाशाचा हल्ला केल्याची घटना घडली. विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

नवापूर तालुक्यातील बंधारे येथे आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शासकिय आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत इयत्ता दुसरी ते सहावीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी हे शाळेच्या मागील बाजूच्या परिसरात खेळत होते. या शाळेच्या खिडकीला मधमाश्यांचे पोळे लागलेले होते. परंतू अचानक त्या पोळ्यावरील मधमाश्यांनी उडून परिसरात खेळत असलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ला करीत चावा घेतला. यामुळे विद्यार्थी आरडाओरड करु लागल्याने आश्रमशाळेच्या अधिक्षकांसह शिक्षकांनी धाव घेतली.

मधमाश्यांनी चावा घेतल्याने 13 विद्यार्थी जखमी झाल्याचे दिसून आले. यावेळी रिक्षात टाकून विद्यार्थ्यांना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील ३ विद्यार्थ्यांना उलटी व मळमळीचा त्रास होत असल्याने पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच 10 विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच विसरवाडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलिस उपनिरीक्षक किरण पाटील, पोकॉ.निखील ठाकरे, लिनेश पाडवी यांनी दवाखान्यात जावून विद्यार्थ्यांची भेट घेत विचारपूस केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT