Maharashtra politics : चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक दावा, राऊत म्हणाले सत्तेसाठी तळवे चाटणार नाही

Chandrakant Patil vs Uddhav Thackeray power claim : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे सत्तेसाठी धडपड करत असल्याचा दावा केला. यावर संजय राऊत यांनी भाजपसोबत युती न करण्याचे ठाम मत मांडले. महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले.
Chandrakant Patil vs Uddhav Thackeray power claim
Chandrakant Patil vs Uddhav Thackeray power claim
Published On

Chandrakant Patil Pune statement Sanjay Raut reply : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांना सत्तेत यायचे आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना केला. चंद्रकांत पाटील यांच्या दाव्याला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही अमित शाह यांच्यासोबत सत्तेत जाणार नाही, असे ठामपणे राऊत यांनी सांगितलेय. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे भाजपसोबत जाणार का? या चर्चेला जोर धरला आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले ?

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ५०० पानाचे पुस्तक लिहिलेय. येत्या काही दिवसांत ते प्रकाशित होईल. त्या पुस्तकाचे वाचन केल्यानंतर संजय राऊत यांनाही चक्कर येईल, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभ्यास त्यांनी इतका केलाय. सत्तेमध्ये नाहीत, त्यामुळे अमित शाह यांच्यावर टीका करतात. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत यायचे आहे. पण त्यांना कुणीच सत्तेत घेत नाही, त्यामुळे किती टीका करणार, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.

Chandrakant Patil vs Uddhav Thackeray power claim
Maharashtra politics : अंगावरचा गुलाल निघण्याआधीच माझ्यावर खुनाचा गुन्हा, जयकुमार गोरेंचा पवारांवर खळबळजनक आरोप

चंद्रकांत पाटील यांना संजय राऊतांचे प्रत्युत्तर-

चंद्रकांत पाटील यांनी आमच्या उमेदवारांबाबत चिंता करू नये. EVM मशीनच्या माध्यमातून निकाल फिरवणे शक्य आहे, निकाल बदलण्यात येतो असे अमेरिकेच्या तुलसी गॅबार्ड यांनी देखील सांगितले. EVM मुळे तुम्ही निवडून आलात, त्यामुळे आमच्या उमेदवरांची चिंता करु नका,असा टोला संजय राऊतांनी पाटलांना लगावला.

Chandrakant Patil vs Uddhav Thackeray power claim
Maharashtra politics : अजितदादांचा ठाकरेंना धक्का, रायगडच्या हुकमी एक्क्याने मशाल सोडली

सत्तेत तळवे चाटणार नाही - राऊत

आम्ही सत्तेसाठी लाचार नाहीत. अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. कबरीला समाधीचा दर्जा दिला त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही. अमित शाह यांच्यासोबत उद्धव ठाकरे कधीही जाणार नाहीत, असे संजय राऊत यांनी नाशिकमध्ये सांगितले. आम्ही अमित शाह यांच्यासोबत सत्तेत जाण्यासाठी लाचार होणार नाही. लबाड्या करणाऱ्यासोबत आम्ही जाणार नाही, तळवे चाटणार नाही असे राऊत यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com