Calling  File Photo
महाराष्ट्र

सावधान ! इंटरनॅशनल कॉल कराल तर होऊ शकते अटक

नियमांचे उल्लंघन करत इंटरनॅशनल कॉल केल्याने रत्नागिरीतील दोघांना अटक; कॉल करण्याचा उद्देश आणि कारण याचा तपास सुरु

अमोल कलये

रत्नागिरी : बेकायदेशीर इंटरनॅशनल कॉल केल्याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तपासातून समोर आले आहे कि, या दोन व्यक्ती इंटरनॅशनल कॉल सेंटर चालवत आहेत. याप्रकरणी रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार मधील मोबाईल शाँपीच्या मालकासह पनवेलमधील एकाला पोलीसांनी अटक केली आहे.

हे देखील पहा -

मुंबई एटीसनं दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.  दरम्यान, देशविरोधी कारवायांसाठी हे इंटरनॅशनल कॉलिंग सेंटर सुरू होते का? तसेच कॉल सेंटर चालवण्यामागचा उद्देश काय होता? याबाबत सध्या तपास सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे.

यावेळी पोलिसांनी सर्वर, लॅपटॉपसह काही साहित्य देखील जप्त केले आहे. सर्व्हर रत्नागिरीत आणि कॉलिंग सेंटर मुंबईतील वांद्रेमधील एका इमारतीत सुरू होते. अशी धक्कादायक माहीती देखील समोर येतेय. वाईपद्वारे हे इंटरनँशनल काँल सुरु होते आणि दहशतवादी कारवायासाठी नेहमी ही पद्धत वापरली जाते असं तज्ञांचं मत आहे. त्यामुळे पुढील तपासातून काय समोर येईल हे महत्वाचं ठरणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांचा आठवावा प्रताप! छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या १२ किल्ल्यांना UNESCO World Heritage दर्जा

Night Sleeping Time: रात्री किती वाजता झोपलं पाहिजे? योग्य वेळ जाणून घ्या

ठाकरेंच्या डरकाळीनंतर अमराठी व्यापाऱ्यांची मराठी शिकण्यास सुरूवात | VIDEO

महापालिका निवडणुकांची तयारी सुरू, राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश, बिगूल कधी वाजणार? VIDEO

Waterfalls near Neral: गर्दी कमी आणि लांब जाण्याचीही गरज नाही! नेरळ-माथेरान जवळ आहेत 'हे' लपलेले धबधबे

SCROLL FOR NEXT