Uday Samant Meet Sharad Pawar saam tv
महाराष्ट्र

Uday Samant Meet Sharad Pawar: शरद पवारांनी दिलेल्या सूचना घेऊन आम्ही पुढे जात आहोत, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

Barsu Refinery News Upadtes: शरद पवारांनी दिलेल्या सूचना घेऊन आम्ही पुढे जात आहोत. त्यांच्या अनुभवाचा सरकार उपयोग करून घेईल असे उदय सामंत म्हणाले.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Uday Samant News: उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बारसूमध्ये काल काय परिस्थिती होती, आज काय परिस्थिती आहे याचं ब्रिफिंग मी शरद पवार साहेबांना दिलं आहे अशी माहिती अद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. काल महिलांना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली होती त्यांना देखील सोडून देण्यात आले आहे असे सामंत म्हणाले. शरद पवारांशी संवाद साधल्यानंतर माध्यमांशी बोलताना अरविंद सावंत यांनी ही माहिती दिली आहे.

ते म्हणाले, शरद पवारांसह आमच्या सर्वांचं एकमत आहे की प्रशासनाने आणि शासनाने शेतकऱ्यांशी बोललं पाहिजे. शासन शेतकऱ्यांशी बोलायला २४ तास उपलब्ध आहे. उद्या जिल्हा प्रशासनाने प्रमुख लोकांसोबत बैठक बोलवली आहे. ही गोष्ट देखील लक्षात घेतली पाहिजे की जसे विरोधक आहेत, तसे समर्थक देखील आहेत.

उदय सामंत म्हणाले, आपण जे सर्वेक्षण म्हणतोय, तर ते सर्वोक्षण नसुन माती चाचणी आहे. ही मातीची चाचणी पूर्ण झाल्यानंतर प्रकल्प (Barsu Refinery) येथे आणायचा की नाही हे कंपनी ठरवणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील सहकार्य केले पाहिजे असे मला वाटते असे सामंत म्हणाले. तसेच ज्या पद्धतीने पॅकेज दायचं आहे, गैरसमज दूर करायचे आहेत, त्यासाठी आम्ही उद्या तेथे शेतकऱ्यांना प्रेझेंटेशन देखील देणार आहोत. सर्व गैरसमज आम्ही दूर करू. शासन त्यासाठी कटिबद्ध आहे. ही चर्चा शरद पवार यांच्यासोबत झाली अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. (Latest Political News)

दरम्यान ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी या प्रकल्पाचं समर्थन केले आहे. प्रशासनाने लोकांना समजावून सांगावं असे साळवी यांनी म्हटले आहे. त्यावर बोलताना सामंत म्हणाले, साळवी यांची जी भूमिका आहे तीच भूमिका शासनाची आहे. शेतकऱ्यांनी आणि प्रकल्पग्रस्थांनी शासनाशी चर्चा करावी असे आवाहन देखील सामंत यांनी यावेळी केले. तसेच राजन साळवी यांनी प्रकल्पाचं समर्थन केल्याबद्दल सामंत यांनी त्यांचे आभार मानले. (Latest Marathi News)

काही लोकांच्या वक्तव्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार असेल तर कारवाई करण्याची मुभा पोलिसांना आणि प्रशासनाला आहे. त्यापद्धतीने कालची कारवाई झाली असेल. परंतु काल अटक केलेल्या सर्व महिला भगिनांना पोलिसांनी घरी नेऊन सोडले आहे, असे उदय सामंत म्हणाले. तसेच शरद पवारांनी दिलेल्या सूचना घेऊन आम्ही पुढे जात आहोत. त्यांच्या अनुभवाचा सरकार उपयोग करून घेईल असे उदय सामंत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT