Maharashtra Politics: मोठी बातमी! भाजपचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्र्यांवर नाराज? एकनाथ शिंदे भाजपला नकोसे झाल्याची चर्चा

Maharashtra Political Crisis: आगामी काळात मुख्यमत्री बदलू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Maharashtra Political Crisis:
Maharashtra Political Crisis: saam tv
Published On

BJPs Senior leaders unhappy with CM Eknath Shinde?: राज्याच्या राजकारणातील आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. भाजपचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदे भाजपला नकोसे झाले असल्याचे देखील बोललं जात आहे. विरोधकांकडून तर मुख्यमंत्री नाराज असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे आगामी काळात मुख्यमत्री बदलू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) आहे. अशातच मुख्यमंत्री गेल्या दोन दिवसांपासून सातारा दौऱ्यावर आहेत. ते नाराज असल्यामुळे गावी गेल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला. त्यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे.

दरम्यान दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदेसंदर्भात फारसे अस्वस्थ नसल्याचे देखील बोललं जात आहे. तसेच आमदार अपात्रतेचा निर्णय आल्यास राजीनामा तयार ठेवा असं शिंदेंना दिल्लीतून सांगितलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

Maharashtra Political Crisis:
Amit Shah Maharashtra Visit: अमित शहा एकाच महिन्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर, मुख्यमंत्री शिंदे स्वागताला जाणार

राजकीय वर्तुळात चर्चेत असलेली कारणं

- मराठा नेता म्हणून शिंदेना जनतेवर हवी तशी छाप सोडता आली नाही.

- शिंदेनी ४० आमदारांसह केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळत असल्याचं चित्र.

- शिंदेंना सोबत घेऊन पुढील निवडणुकी लढल्यास भाजपला फायदा होणार नाही.

- ग्रामपंचायत आणि नगरपरिषदांसारख्या निवडणुकांत शिंदे अधिक छाप पाडू शकले नाहीत.

- सत्तेत आल्यानंतर एकनाथ शिंदे लोकाभिमुख निर्णय घेत नसल्याचीही ओरड.

- वेदांता फॉक्सकॉन, खारघर दुर्घटनेनंतर एकनाथ शिंदे एकाकी पडल्याचं चित्र.

- एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ८३ हजार कोटी रुपयांचा निधी तर भाजपला २ लाख कोटींचा निधी.

भाजपला शिंदेंकडून काय अपेक्षा होत्या?

भाजपने एकनाथ शिंदे यांना सोबत घेतले तेव्हा त्यांच्या अपेक्षा अशा होत्या की एक मराठा नेता आपल्यासोबत येत आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातलं राष्ट्रवादी काँग्रेसचं केडर तोडून ते तिथे भाजपला मदत करतील अशी डील झाली असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र एकनाथ शिंदे ठाणे आणि पालघर याच्या पलिकडे जाऊ शकलेले नाही असे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्यावर नाराजी असल्याचे बोललं जात आहे. (Latest Political News)

Maharashtra Political Crisis:
CM Eknath Shinde: अडीच वर्षे घरी बसलेल्यांनी मी दोन तीन दिवस इकडे तिकडे गेलो तर... मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

निकालानंतर भाजपची बार्गेनिंग पावर वाढणार!

याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने जरी विधानसभा अध्यक्षांकडे प्रकरण सोपवलं तरी भाजपचीच बार्गेनिंग पावर वाढणार आहे. कारण विधानसभा अध्यक्ष हे भाजपचे आहेत. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात काय निर्णय घेताना भाजपची बार्गेनिंग पावर वाढणार आहे.

भाजपला लोकसभा निवडणुकीत नकोय अडचण

याशिवाय शिंदेंना सोबत घेतल्याने राज्यात जो नाराजीचा सूर पाहायला मिळतोय, त्यामुळे भाजप लोकसभा निवडणुकीत २० जागांच्या पुढे जाताना दिसत नाहीये. याच सर्व कारणांमुळे भाजपच्या नेतृत्त्वाला लोकसभा निवडणुकीत कोणतीही अडचण येऊ नकोय म्हणून एकनाथ शिंदे यांच्या बाबातीत विचार करण्याची वेळ आली असल्याचे बोलले जात आहे. मात्र सध्या तरी काही महिने शिंदेंना अभय देण्यात आल्याचे देखील कळतेय. (Latest Marathi News)

Edited By - Chandrakant Jagtap

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com