CM Eknath Shinde: अडीच वर्षे घरी बसलेल्यांनी मी दोन तीन दिवस इकडे तिकडे गेलो तर... मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक तीन दिवसांची सुट्टी घेतल्याची चर्चा मंगळवारी राजकीय वर्तुळात रंगली होती.
Barsu project  CM Eknath Shinde
Barsu project CM Eknath Shindesaam tv
Published On

Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक तीन दिवसांची सुट्टी घेतल्याची चर्चा मंगळवारी राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान बारसु प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी अडीच वर्षे घरी बसलेल्यांनी, मी दोन तीन दिवस इकडे तिकडे गेलो असे बोलावे हे नवलच आहे, असा खोचक टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचं नाव न घेता म्हणाले, अडीच वर्षे घरी बसलेल्यांनी मी दोन तीन दिवस इकडे तिकडे गेलो असे बोलावे हे नवलच आहे. बारसु प्रकल्प व्हावा आणि त्या भागाचा विकास व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं होतं. त्यावेळी त्यांनीच या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला. मग त्यावेळेस काही विशिष्ट तडजोडी झाल्या होत्या का आणि आता मुख्यमंत्री पद गेल्यावर या प्रकल्पाला विरोध का? हा दुटप्पी पणा आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Barsu project  CM Eknath Shinde
GT VS MI Match Result: 'गुरु' वर 'शिष्य' पडला भारी! गुजरातचा मुंबईवर ५५ धावांनी जोरदार विजय

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या माती सर्वेक्षणाला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. याबाबत राज्य सरकारने जनआंदोलनाला संवेदनशीलतेने सामोरे जावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. लोकांच्या विरोधावर तोडगा निघेपर्यंत शिंदे सरकारने बारसू येथील माती सर्वेक्षणाचे काम थांबवावे, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली होती. पर्यावरणाच्या चिंतेमुळे विरोध होत असल्यास तज्ज्ञांच्या मदतीने शंका दूर कराव्यात, असेही ते म्हणाले.

30 महिलांना अटक

रत्नागिरीतील रिफायनरी साईटवर आंदोलन करणाऱ्या 30 महिलांना अटक करण्यात आली. शिवसेनेने (यूबीटी) महिलांच्या अटकेला विरोध केला आहे. वृत्तानुसार बारसू गावातील रिफायनरीच्या प्रस्तावित जागेत सरकारी वाहनांना प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी रस्त्यावर पडून आंदोलन करणाऱ्या ३० हून अधिक महिलांना पोलिसांनी अटक केली. (Latest Marathi News)

Barsu project  CM Eknath Shinde
Rashi Bhavishya In Marathi : या लोकांना आज अचानक धनलाभाची शक्यता, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

का होतोय विरोध?

या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. या रिफायनरी प्रकल्पामुळे कोकण किनारपट्टीवरील जैवविविधतेवर विपरीत परिणाम होणार असल्याचे बारसू गावातील आणि आसपासच्या लोकांना वाटत असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर त्यांच्या उदरनिर्वाहावरही परिणाम होणार आहे. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे गटाने आंदोलकांनाचे समर्थन केले आहे. स्थानिकांना विस्थापित करून हा प्रकल्प होऊ नये अशी अशी ठाकरे गटाची भूमिका आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com