GT VS MI Match Result: 'गुरु' वर 'शिष्य' पडला भारी! गुजरातचा मुंबईवर ५५ धावांनी जोरदार विजय

GT VS MI Match Highlights: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ३५वा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला
MI vs GT Match IPL 2023  gujarat titans won by 55 runs
MI vs GT Match IPL 2023 gujarat titans won by 55 runsSaam TV
Published On

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ३५वा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला २०८ धावांची गरज होती. मात्र मुंबई इंडियन्स संघाला अवघ्या १५२ धावा करता आल्या.

या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने ५५ धावांनी विजय मिळवला आहे.

MI vs GT Match IPL 2023  gujarat titans won by 55 runs
GT vs MI IPL 2023: नरेंद्र मोदी स्टेडियमवर धावांचा पाऊस; गिल-मिलरने मुंबईला धुतलं, गुजरातची २०७ धावांपर्यंत मजल

गुजरात टायटन्स संघाने केल्या २०७ धावा..

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर गुजरात टायटन्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिलने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली.

तर डेव्हिड मिलरने ४२ धावांचे योगदान दिले. शेवटी राहुल तेवतियाने नाबाद २० धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने ६ गडी बाद २०७ धावा केल्या होत्या.(Latest sports updates)

MI vs GT Match IPL 2023  gujarat titans won by 55 runs
Virat - Rohit Exit In IPL?: क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का! विराट अन् रोहीत IPL मधुन घेणार एक्सिट,मोठं कारण आलं समोर

मुंबईचा संघ धावा करण्यात ठरला अपयशी..

या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. रोहित शर्मा अवघ्या २ त्रसर ईशान किशन १३ धावा करत माघारी परतला. मुंबई इंडियन्स संघाकडून नेहाल वाढेराने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. मात्र नुर अहमद आणि राशिद खानच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने ५५ धावांनी विजय मिळवला.

MI vs GT Match IPL 2023  gujarat titans won by 55 runs
IPL 2023, DC vs SRH: सुंदर, भुवनेश्वरचा भेदक मारा, हैदराबादने दिल्लीला 144 धावांवर रोखलं

डेव्हिड - शुभमनची तुफानी खेळी...

गुजरात टायटन्स संघाकडून डेव्हिड मिलर आणि शुभमन जोरदार कामगिरी करतोय. या हंगामात दोन्ही फलंदाज संघासाठी मोलाची कामगिरी करताना दिसून आले आहेत. या सामन्यात देखील दोघांनी चांगली कामगिरी केली आणि आपल्या संघाला मोठी धावसंख्या करून दिली. या सामन्यात शुभमन गिलने ३४ चेंडूंचा सामना करत ५६ धावांची खेळी केली. तर गिलने अवघ्या २२ चेंडूंचा सामना करत ४६ धावांची खेळी केली.

दोन्ही संघांची प्लेइंग 11 :

गुजरात टायटन्स प्लेईंग ११ : वृद्धीमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, विजय शंकर, डेविड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, मोहम्मद शामी, नूर अहमद, मोहित शर्मा

मुंबई इंडियन्स प्लेईंग ११ : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेविड, नेहाल वढेरा, रायली मेरीडथ, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, पीयुष चावला, जेसन बेहनड्रॉफ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com