barshi to delhi cycling demanding maratha reservation saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील युवकाची सायकलवरुन दिल्ली यात्रा (पाहा व्हिडिओ)

दिल्लीत पाेहचण्यासाठी 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागेल असे मराठा युवकांनी नमूद केले.

विश्वभूषण लिमये

Solapur News :

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी बार्शीतील एका मराठा बांधवाने बार्शी ते दिल्ली सायकल यात्रेला (barshi to delhi bicycle yatra सुरुवात केली आहे. आज (गुरुवार) बंडू लोकरे (bandu lokre) यांनी त्यांच्या यात्रेस प्रारंभ केला. विविध मान्यवरांसह पंतप्रधान यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आरक्षणाची मागणी करणार असल्याचे लाेकरे यांनी साम टीव्हीशी बाेलतान नमूद केले. (Maharashtra News)

मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील (manoj jarange patil) यांच्या समर्थनार्थ बंडू लोकरे यांनी बार्शी ते दिल्लीपर्यंत संघर्ष यात्रा सुरू केली आहे. बार्शीतील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून बंडू लोकरे यांनी सायकल यात्रेची सुरुवात केली आहे.

या सायकलवर दोन्ही बाजूने मराठा आरक्षणाचे बोर्ड लावण्यात आले आहेत. गरजवंत मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे. ते दिल्लीत राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची भेट घेऊन मराठा आरक्षण संदर्भात निवेदन देणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा बांधवांकडून बंडू लोकरे याचे जोरदार स्वागत करून बार्शी ते दिल्लीपर्यंत त्याच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या आहेत. बार्शी ते दिल्ली हा साधारण सोळाशे किलोमीटरचा प्रवास सायकलवरून लोकरे करणार आहेत. त्यासाठी त्यांना 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT