Ujani Dam Saam tv
महाराष्ट्र

Ujani Dam: उजनीत चार दिवसात ४.८८ टक्क्यांने पाणी साठा वाढला; मुसळधार पावसामुळे धरणात आवक

Solapur Dam News: गतवर्षी कमी पावसाळा झाल्यामुळे धरणात अधिक पाणी साचले नाही. जे पाणी होते ते देखील उन्हाच्या तीव्रतेमध्ये पाण्याचे बाष्पीभवन होऊन कमी झाले होते

मंगेश कचरे

बारामती: पुणे शहरात मागील चार दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे जवळच असलेल्या उजनी धरणात पाणी येण्यास सुरवात झाली आहे. मागील चार दिवसात ४.८८ टक्के इतका पाणी साठा वाढला असून धरणातील पाणी पातळीत २.२ टीएमसीने वाढ झाली आहे.

गतवर्षी कमी पावसाळा झाल्यामुळे धरणात अधिक पाणी साचले नाही. जे पाणी होते ते देखील उन्हाच्या तीव्रतेमध्ये पाण्याचे बाष्पीभवन होऊन कमी झाले होते. या ७ जुनला (Ujani Dam) उजनी धरण हे उणे ५९.९९ टक्के होते. आज चौथ्या दिवशी उजनी धरणात उणे ५५ पूर्णांक ८८ टक्के पाणी साठा झाला असून चार दिवसात उजनी धरणात २ पूर्णांक २ टीएमसी पाणी साठ्याची वाढ झाली. सध्या उजनी धरणात उणे २९ पूर्णांक ९४ टीएमसी इतका पाणी साठा आहे. 

पाऊस आल्यास पाणी पातळीत वाढणार

पुणे शहर परिसरात चार दिवस चांगला दमदार पाऊस (Rain) झाल्याने उजनी धरणात पाण्याची आवक होण्यास सुरवात झाली आहे. तर उजनीत दौंड बंधाऱ्यातून ४८६७ क्युसेक इतका विसर्ग येत असून भविष्यात पाऊस असाच राहिला हा विसर्ग वाढू शकतो. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

Rava Khobra Ladoo Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी रवा खोबरं लाडू

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Recruitment : मुंबई महापालिकेत नोकरीची संधी; पगार ३०,००० रुपये; आजच करा अर्ज

Jio Special Offer: जिओचा डबल धमाका! एका प्लॅनसोबत दुसरा प्लॅन फ्री, काय आहे ऑफर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT