Soyabean Seeds : लातूर जिल्ह्यात महाबीज ७१ सोयाबीन वाणाचा तुटवडा; बुकिंग करूनही पुरवठा नाही

Latur News : यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीसाठी लातूर जिल्हात शेतकऱ्यांची बी- बियाणे खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
Soyabean Seeds
Soyabean SeedsSaam tv
Published On

संदीप भोसले 
लातूर
: लातूर जिल्हा हा प्रामुख्याने सोयाबीन आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. त्यामुळे सोयाबीनची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात करत असतात. यादृष्टीने विक्रेत्यांकडून देखील बुकिंग करून बियाणाची मागणी केलेली असते. मात्र शेतकऱ्यांना अपेक्षित असलेले महाबीज ७१ नंबर हे सोयाबीन बियाणे मिळत नसल्याची शेतकऱ्यांमधून ओरड होत आहे. 

Soyabean Seeds
Pimpri Chinchwad Corporation : विनापरवानगी रस्ता खोदून दोन कोटींचे नुकसान; पिंपरी चिंचवड महापालिकेकडून दोघांवर गुन्हा दाखल

यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीसाठी लातूर (Latur) जिल्हात शेतकऱ्यांची बी- बियाणे खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र शेतकऱ्यांकडून विश्वासाच मानले जाणाऱ्या महामंडळाच सोयाबीन ७१ नंबर व्हरायटीचे बियाणे सध्या बाजारात मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून ओरड होत आहे. आता मान्सूनचे आगमन झाले असल्याने पेरणीची लगबग सुरु होईल. यामुळे (farmer) शेतकऱ्यांकडून बियाणाची मागणी होत आहे. 

Soyabean Seeds
Pandharpur News : पंढरपूर आळंदी पालखी मार्ग खचला; दीड वर्षांपूर्वीच झाले होते रस्त्याचे काम

पुरवठाच नाही 

लातूर जिल्ह्यासाठी फक्त २ हजार ७०० क्विंटल (Soyabean) सोयाबीन-७१ नंबर वरायटीचं बियाणं पुरवठा करण्यात आलं होतं. मात्र लातूर जिल्ह्यात जवळपास ६ लाख हेक्टरवर एकट्या सोयाबीन पिकाचा पेरा होतो. त्यामुळे बियाणे मिळत नसल्याने शेतकरी आणि महाबीजचे अधिकृत विक्रेते हे महामंडळाच्या महाबीज कंपनीच्या नावाने ओरड करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com