Ujani Dam Saam tv
महाराष्ट्र

Ujani Dam : उजनी धरण मायनसमध्ये; पाणीसाठा झपाट्याने होतोय कमी, पाणी संकट उद्भवणार

Baramati news : उजनी धरण १०० टक्के क्षमतेने भरते. तेव्हा उजनी धरणात ११७ टीएमसी इतका पाणीसाठा. त्यापैकी ५४ टीएमसी पाणीसाठा हा जिवंत पाणीसाठा म्हणून ग्राह्य धरला जातो. तर उर्वरित ६३ टीएमसी पाणीसाठा मृत गणला जातो

मंगेश कचरे

बारामती : पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यासाठी जीवनदायनी ठरत असलेल्या उजनी धरणातील पाणी साठ्यामध्ये झपाट्याने घट होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. आज उजनी धरण मायनसमध्ये गेले असून, धरणात एकूण ६३ पूर्णांक ६२ इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. अर्थात कालच्या तुलनेत उजनी धरण सध्या ०.०६ टक्के मायनसमध्ये गेले असल्याने आगामी काळात पुण्यासह सोलापूर व नगर जिल्ह्यासाठी पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. 

उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ही १२३ टीएमसी इतकी आहे. जेव्हा उजनी धरण १०० टक्के क्षमतेने भरते. तेव्हा उजनी धरणात ११७ टीएमसी इतका पाणीसाठा मावतो. त्यापैकी ५४ टीएमसी पाणीसाठा हा जिवंत पाणीसाठा म्हणून ग्राह्य धरला जातो. तर उर्वरित ६३ टीएमसी पाणीसाठा हा मृत पाणीसाठा म्हणून गणला जातो. आज उजनी मायनसमध्ये म्हणजे मृत पातळीत गेले आहे.

सकाळी सहा वाजता मायनसमध्ये 

पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जीवनदायनी ठरलेलं उजनी धरण आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास मायनसमध्ये गेले आहे. उजनी धरण प्रशासनाकडून सकाळी सहा वाजता देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार उजनी धरण सध्या ०.०६ टक्के वजा मध्ये आहे. सध्या उजनी धरणात एकूण साठवण क्षमतेच्या ६३ पूर्णांक ६२ टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे.

काटेपुर्णा प्रकल्पातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती २६.२१ टक्के
अकोला
: अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पाची पाणी पातळी कमी झाली आहे. यामुळे अकोलेकरांना आता तब्बल पाच दिवसानंतर पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. दहा दिवसांपूर्वी अकोला शहराला ३ दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. गेल्याच आठवड्यात महापालिकेने चार दिवसानंतर पाणीपुरवठा करण्याचा निर्णय अंमलात आणला होता. मात्र, दिवसेंदिवस कमी होणारी पाणी पातळी पाहता महापालिकेने आता ५ दिवसानंतर पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT