Bajar Samiti : दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती; राज्यात नव्या ६५ बाजार समित्यांना मंजुरी

Solapur News : राज्यातील अनेक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये आतापर्यंत बाजार समिती सुरु करण्यात आलेल्या नव्हत्या. अशा ठिकाणी नवीन बाजार समिती सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
Bajar Samiti
Bajar SamitiSaam tv
Published On

सोलापूर : सोलापूर बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच राज्य शासनाने राज्यातील २१ जिल्ह्यांत ६५ नवीन बाजार समित्या मंजूर केल्या आहेत. यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती मंजूर करण्यात आली आहे. यामुळे सोलापूरच्या बाजार समितीमध्ये खरेदी- विक्री साठीचा भार कमी होणार आहे. हि प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. 

राज्यातील अनेक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये आतापर्यंत बाजार समिती सुरु करण्यात आलेल्या नव्हत्या. अशा ठिकाणी नवीन बाजार समिती सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार २१ जिल्ह्यांमध्ये ६५ बाजार समित्यांना मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे जवळच्या बाजार समित्यांवर येणार भार कमी होणार असून शेतकऱ्यांना देखील वाहतुकीसाठी लागणार खर्च कमी होणार आहे. 

Bajar Samiti
Teacher Recruitment Scam : शिक्षक भरती घोटाळ्याचे भंडाऱ्यातही धागेदोरे; नवप्रभात संस्थेचेही नाव आले समोर

निवणुकीच्या धामधुमीतच बाजार समितीला मंजुरी 
दरम्यान सोलापूर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून,या बाजार समितीचे कार्यक्षेत्र उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर हे दोन तालुके आणि सोलापूर शहर हद्दवाढ भागातील १५ विकास संस्थांचा समावेश आहे. या बाजार समितीची निवडणूक सुरू असतानाच राज्य शासनाने राज्यातील २१ जिल्ह्यांत नवीन ६५ बाजार समित्यांना मंजुरी दिली आहे. यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती मंजूर करण्यात आली आहे.  

Bajar Samiti
Kalyan Accident : थरकाप उडविणारा अपघात; ट्रकच्या चाकाखाली सापडली दुचाकी, वडिलांसह मुलगी गंभीर जखमी

२१ जिल्ह्यात वाढणार बाजार समिती  

राज्यात या पूर्वी ३०५ बाजार समिती आणि ६२५ उपबाजार कार्यरत आहेत. मात्र आतापर्यंत ६८ तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नव्हत्या. यामुळे आता ६५ तालुक्यांमध्ये बाजार समिती सुरु करण्यात येणार आहे. यात दक्षिण सोलापूरचा समावेश आहे. तर उर्वरित २१ जिल्ह्यापैकी सिन्धुदुर्ग जिल्ह्यात ७, रत्नागिरी ८, रायगड ६, पालघर ५, जळगाव ३, सांगली ३, गडचिरोली ७, कोल्हापूर ८, नाशिक, अमरावती, नागपूर, भंडारा, संभाजीनगर, बीड आणि सोलापूर जिल्ह्यात प्रत्येकी २, ठाणे, पुणे, गोंदिया, नांदेड आणि सातारा जिल्ह्यात प्रत्येकी १ बाजार समिती होणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com