Teacher Recruitment Scam : शिक्षक भरती घोटाळ्याचे भंडाऱ्यातही धागेदोरे; नवप्रभात संस्थेचेही नाव आले समोर

Bhandara News : नागपूर येथे झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती राज्यभरात पसरल्याचे पाहण्यास मिळत आहे. हा शिक्षक भरतीचा घोटाळा साधारण ४०० ते ५०० कोटी रुपयांचा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे
Teacher Recruitment Scam
Teacher Recruitment ScamSaam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
: राज्यात २०१२ पासून शिक्षक भरती बंद करण्यात आली. मात्र अनेक शिक्षकांना बॅकडेटमध्ये भरती केल्याबाबत मान्यता दाखविण्यात आली आहे. हा शिक्षण क्षेत्रात कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचे दर्शनास आला आहे. आता या प्रकरणात भंडारा जिल्ह्यातील नवप्रभात शिक्षण संस्थेचे देखील नाव आलं आहे. यामुळे भंडारा शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता चौकशी करण्यात येत आहे.

नागपूर येथे झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती राज्यभरात पसरल्याचे पाहण्यास मिळत आहे. हा शिक्षक भरतीचा घोटाळा साधारण ४०० ते ५०० कोटी रुपयांचा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यानंतर आता भंडारा जिल्ह्यात देखील या शिक्षक भरतीची तार पोहचली असून एका मोठ्या शिक्षण संस्थेचे नाव यात समोर येत आहे. दरम्यान राज्यात कुठेही २०१२ नंतर शिक्षक भरती करण्यात आली नाही. तरी सुद्धा शिक्षण संस्था चालकांनी आर्थिक लाभापोटी शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक व कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन मंत्रालयातून विशेष बाब म्हणून हि नियुक्ती करवुन घेतली. 

Teacher Recruitment Scam
Kalyan : पलावा- काटई उड्डाणपूल मे अखेरीस होणार खुला; वाहतूक कोंडीपासून होणार सुटका

भंडाऱ्याच्या शिक्षण संस्थेचे नाव 

हे सर्व प्रकरण समोर येताच मोठी खळबळ उडाली असून मंत्रालय स्तरावरून कारवाईचे पाऊले उचलली जात आहेत. याप्रकरणी ५८० बोगस शिक्षकांचे वेतनही थांबवण्यात आले आहे. तर ५ जणांना अटकही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यातील ही धागेदोरे या प्रकरणात असल्याचे दिसून येत आहे. अनुभव नसताना मुख्याध्यापक पद मिळालेल्या पराग उईकेला भंडारा जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. तर भंडाऱ्यातीलच नवप्रभात शिक्षण संस्थेचं देखील नाव या प्रकरणात पुढे येत आहे.   

Teacher Recruitment Scam
Buldhana Accident : देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; उभ्या ट्रकला बसची धडक, ३५ भाविक जखमी

चौकशीसाठी एसआयटी नेमण्याची मागणी 

आता या सर्व प्रकरणात समिती नेमून कारवाई करण्यापेक्षा एसआयटी गठीत करावी. अशी मागणी नागपूरचे माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केली आहे. या प्रकरणात चौकशी दरम्यान आणखी काय समोर येते. कुणावर आणि नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com