NIA Raid Saam tv
महाराष्ट्र

NIA Raid : इंदापूरमध्येही तपास यंत्रणांची छापेमारी; नेचर डिलाईट डेअरीमध्ये सकाळपासूनच तपासणी

Baramati news : इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील नेचर डिलाईटचे अर्जुन देसाई यांच्या घरी देखील पहाटेपासूनच हे अधिकारी दाखल झाले आहेत. मात्र कोणत्या खात्याचे हे अधिकारी आहेत; हे अद्याप समजू शकलेले नाही

मंगेश कचरे

बारामती : फलटण पाठोपाठ पुण्याच्या इंदापूरमध्ये देखील तपास यंत्रणांच्या धाडी टाकल्या आहेत. याठिकाणी काही व्यवसायिकांच्या घरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे. यात नेचर डिलाईटच्या देसाई आणि जामदार याच्या घरी तपास यंत्रणांचे अधिकारी दाखल झाल्याची माहिती असून नेचर डिलाईट डेअरीच्या ठिकाणी तपास यंत्रणांकडून छापेमारी करत तपासणी करण्यात येत आहे. 

फलटण पाठोपाठ पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील काही खाजगी व्यावसायिकांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणांनी धाडी टाकल्याची माहिती समोर येत आहे. इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील नेचर डिलाईटचे अर्जुन देसाई यांच्या घरी देखील आज सकाळी पहाटेपासूनच हे अधिकारी दाखल झाले आहेत. मात्र कोणत्या खात्याचे हे अधिकारी आहेत; हे अद्याप समजू शकलेले नाही. तर आयकर विभागाची धाड असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

देसाईंच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त 
दरम्यान अर्जुन देसाई यांच्या घरी सकाळपासूनच केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी दाखल झाले असून कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच देसाई यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. सर्वसामान्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. तर दुसरीकडे देसाई यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या मयूर जामदार यांच्या घरी देखील तपास यंत्रणांचे अधिकारी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

डेअरी, हॉस्पिटलमध्ये तपासणी 
अर्जुन देसाई आणि मयूर जामदार यांच्याशी निगडित असणाऱ्या इंदापूर तालुक्यातील कळस येथील नेचर डिलाईट डेअरीच्या ठिकाणी देखील केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी सकाळपासूनच पोहचले आहेत. त्या ठिकाणी देखील कसून चौकशी केली जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर इंदापूर- बारामती मार्गावर चिखली फाट्यावरील देसाई हॉस्पिटल या ठिकाणी देखील ही तपास यंत्रणा पोहचली असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात शालेय पोषण आहार योजना घोटाळ्यावरुन कृती समिती आक्रमक

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

SCROLL FOR NEXT