Baramati Car Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Baramati Accident: भरधाव कारचा टायर फुटला, अपघातामध्ये काँग्रेस नेत्याच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Congress Leader Son Dies In Car Accident: बारामती तालुक्यातील संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. रुई गावाच्याहद्दीत भरधाव कारचा टायर फुटला आणि अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला.

Priya More

मंगेश कचरे, इंदापूर

बारामतीमधून भीषण अपघाताची (Baramati Car Accident) घटना समोर आली आहे. भरधाव कारचा टायर फुटून अपघात झाला. या अपघातामध्ये इंदापूरमधील काँग्रेस (Congress) नेत्याच्या मुलाचा मृत्यू झाला. बारामती तालुक्यातील रूई येथे ही अपघाताची घटना घडली. याप्रकरणी इंदापूर पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. रुई गावाच्याहद्दीत भरधाव कारचा टायर फुटला आणि अपघात झाला. या अपघातामध्ये इंदापूर तालुक्यातील सणसर गावातील तरुणाचा मृत्यू झाला. आदित्य आबासाहेब निंबाळकर असे या तरुणाचे नाव आहे. आदित्य इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांचा मुलगा आहे.

मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास बारामती तालुक्यातील रुई गावच्या पाटीनजीक हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य हा काटेवाडीकडून रुई मार्गे बारामतीत येत होता. त्याच्या कारचा अचानक टायर फुटला आणि कार पलटी झाली. ही कार एका इमारतीच्या कडेला जाऊन आदळली.

हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातामध्ये आदित्य गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आदित्यच्या मृत्यूमुळे निंबाळकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - सोलापूर जिल्ह्यात माढा येथे सर्वाधिक पुरस्थिती

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Pune Crime News : दिवसा खासगी बँकेत नोकरी, रात्री करायचा भयंकर खेळ; पुण्यातील तरुणासह ३९ जण अडकले

Diabetes: डायबिटीज कंट्रोल होत नाहीये? या गोष्टीची कमी वाढवू शकतं टेन्शन

SCROLL FOR NEXT