Yavatmal ST Bus Accident : यवतमाळमध्ये वारकऱ्यांच्या एसटी बसला अपघात; 45 जणांचा थोडक्यात वाचला जीव

Yavatmal ST Bus Accident News : वर्धा येथून वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरकडे निघालेल्या बसला यवतमाळच्या पुसदजवळ अपघात झाला. भरधाव वेगात असलेली एसटी बस डिव्हायरला धडकली.
Yavatmal ST Bus Accident News
Yavatmal ST Bus Accident NewsSaam TV
Published On

आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून सर्व भक्तांना विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. त्यामुळे गावागावातून एसटी बसने वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. अशातच वर्धा येथून वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरकडे निघालेल्या बसला यवतमाळच्या पुसदजवळ अपघात झाला. भरधाव वेगात असलेली एसटी बस डिव्हायरला धडकली.

Yavatmal ST Bus Accident News
Yavatmal News: 'मृत्यूनंतरही मरणयातना...' खांद्यावर मृतदेह घेऊन नदी ओलांडली अन् उरकला अंत्यविधी; यवतमाळमधील मन सुन्न करणारी घटना

सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितनाही झाली नाही. मात्र, काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना प्राथामिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. धक्कादायक बाब म्हणजे, या बसचा चालक आणि वाहक दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते, असा आरोप प्रवाशांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त एसटी बस वर्धा येथून वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघाली होती. यवतमाळच्या पुसदजवळ बस आली असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट डिव्हायडरला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती, की आतमध्ये बसलेल्या प्रवाशांना हादरा बसला.अपघातानंतर एसटी जागेवरच थांबली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, अपघातानंतर वारकरी पटापटा एसटी बसच्या बाहेर पडले. या अपघातात एक वयोवृद्ध महिला आणि एका तरुणाला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. चालक मद्यधुंद अवस्थेत एसटी चालवत असल्यामुळे हा भीषण अपघात घडला, असा आरोप वारकऱ्यांनी केला आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर वारकऱ्यांच्या बसला अपघात

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने झडप घातली. मुंबईहून पु्ण्याकडे निघालेल्या खासगी बसचा पनवेलजवळ सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. बससमोर अचानक ट्रॅक्टर आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बस ट्रॅक्टरला धडकून २० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Yavatmal ST Bus Accident News
Panvel Bus Accident : पंढरपूरला निघालेल्या भाविकांवर काळाची झडप; खासगी बस दरीत कोसळली, ५ जणांचा जागीच मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com