Ajit Pawar Saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar : ४१ वर्षानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगावच्या रिंगणात; साखर कारखान्यासाठी उमेदवारी

Baramati News : बारामती तालुक्यातील माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. यासाठी नामनिर्देश भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी २२ जून रोजी मतदान पार पडणार आहे

मंगेश कचरे

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव साखर कारखाना निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. माळेगाव कारखान्यासाठी ब वर्गातून अजित पवारांची उमेदवारी भरली आहे. अजित पवार यांनी १९८४ ला इंदापूरच्या छत्रपती कारखान्यापासून अजित पवारांच्या कारकिर्दी सुरुवात झाली. आता १९८४ नंतर पुन्हा ४१ वर्षांनी अजित पवार हे माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरत आहेत. 

बारामती तालुक्यातील माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. यासाठी नामनिर्देश भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी २२ जून रोजी मतदान पार पडणार आहे. तर आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुद्द ब वर्ग प्रतिनिधी म्हणून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

अधिकृत घोषणा 
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पुरस्कृत श्री निळकंठेश्वर पॅनलचे अधिकृत उमेदवारांची यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये ब वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. यामुळे अजित पवार यांची साखर कारखान्यातील उमेदवारी निश्चित मानली जात असून या निवडणुकीत चुरस वाढणार आहे. 

पुन्हा एकदा साखर कारखाना निवडणुकीच्या रिंगणात 
दरम्यान १९८४ साली इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची निवडणूक लढवून अजित पवारांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतः उमेदवारी दाखल केली आहे. आज तीन वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून अजित पवार स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT