Baramati News Ajit Pawar Group Many gram panchayat election Result 2023 Saam TV
महाराष्ट्र

Gram Panchayat Result: बारामतीत अजित पवारांची हवा, सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात; भाजपला मोठा फायदा

Baramati Gram Panchayat Result: बारामती तालुक्यात अजित पवार गटाने आपला दरारा कायम ठेवत सर्वाधिक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.

Satish Daud

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. आज या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये राज्यात भाजप हा पुन्हा नंबर १ चा पक्ष ठरला आहे. भाजपपाठोपाठ अजित पवार गटाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. बारामती तालुक्यातही अजित पवार गटाने आपला दरारा कायम ठेवत सर्वाधिक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुसरीकडे भाजपने सुद्धा बारामतीतील दोन ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवला आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर राज्यात पहिल्यांदाच निवडणुका झाल्या. बारामती ग्रामपंचायतीत अजित पवार यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळे महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकींकडे लागलं होतं.

बारामतीत अजित पवार गटाने ३२ पैकी २७ ग्रामपंचायतीवर विजय खेचून आणला आहे. भोंडवेवाडी, म्हसोबानगर पवई माळ, आंबी बुद्रुक, पानसरे वाडी, गाडीखेल, जराडवाडी, करंजे, कुतवळवाडी दंडवाडी, मगरवाडी, निंबोडी, साबळेवाडी, उंडवडी कप, काळखैरेवाडी, चौधरवाडी, वंजारवाडी, चांदगुडेवाडी या गावात अजित पवारांचा गट विजयी झाला आहे.

दुसरीकडे बारामती तालुक्यात भाजपचा पहिला सरपंच विजयी झाला आहे. चांदगुडेवाडी येथील ग्रामपंचायतीवर भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. बारामती पाठोपाठ अजित पवार गटाने शिरूर तालुक्यात देखील वर्चस्व मिळवलं आहे. सर्वांत मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या रांजणगाव ग्रामपंचायतवरती अजित पवार गटाने वर्चस्व मिळवलं आहे.

रांजणगाव ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाने १३ जागा जिंकल्या आहेत. याशिवाय सरपंच पदाच्या जागेवरही मोठा विजय मिळवला आहे. दुसरीकडे शरद पवार गटाला शिरुरमध्ये फक्त ३ जागा जिंकता आल्या आहेत. शिरुरसारखी मोठी ग्रामपंचायत हातातून गेल्याने शरद पवार गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT