Baramati : शेततळ्यात पडून मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू! SaamTvNews
महाराष्ट्र

Baramati : शेततळ्यात पडून मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू!

शेततळ्यात उतरून पिण्यासाठी पाणी काढताना पाय घसरून पडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत मायलेकींचा करुण अंत झाल्याची घटना बारामतीतील अंजनगाव येथे घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बारामती : शेततळ्यात उतरून पिण्यासाठी पाणी काढताना पाय घसरून पडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत मायलेकींचा करुण अंत झाल्याची घटना बारामतीतील अंजनगाव येथे घडली आहे. दोन मुली व त्यांची आई अश्या तिघी जणी पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. या घटनेत तिघींपैकी एक मुलगी सुदैवाने बचावली आहे. तिने आरडाओरडा केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. अश्विनी सुरेश लावंड (वय ३५), समृद्धी सुरेश लावंड (वय १५) अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मायलेकींची नावे आहेत.

हे देखील पहा :

मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी लावंड या आपल्या दोन मुलींसह शेतात बकऱ्या चरायला जातात. काल दुपारी (१४ सप्टेंबर) साडेतीन वाजेच्या सुमारास शेततळ्यातून बाटलीच्या मदतीने पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी समृद्धी शेततळ्यावर गेली होती. त्यावेळी शेततळ्यात टाकण्यात आलेल्या ताडपत्रीवरून तिचा पाय घसरला व ती बुडू लागली. मुलीला वाचवण्यासाठी अश्विनी यांनी प्रयत्न केला मात्र त्यांचाही पाय घसरला आणि दोघीही पाण्यात पडल्या. या दोघींना वाचवण्याचा प्रयत्न करणारी तिसरी मुलगी श्रावणी देखील दुर्दैवाने पाण्यात पडली.

मात्र, श्रावणी शेततळ्यातील ताडपत्रीला धरून बाहेर पडली व तिने आरडाओरडा केला. तिच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला. परंतू, तिथं नागरिक येण्यापूर्वीच अश्विनी आणि समृद्धी यांचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, मृतदेह शेततळ्यात असल्याने व शेततळ्याच्या प्लॅस्टिकच्या अडथळ्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. स्थानिक उद्योजक सुरेश परकाळे यांच्या पुढाकाराने रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बारामती येथील सुभाष परकाळे, सुभाष वायसे या युवकांच्या मदतीने बुडालेल्या मायलेकींचा शोध घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आले. रात्री उशिरा मृतदेह शवविच्छेदनासाठी बारामतीच्या सिल्वर जुबली रुग्णालयात पाठवण्यात आले.

Edited By : Krushnarav Sathe

हेही वाचा :

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शन पास मध्ये छेडछाड; तारीख बदलवून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न

Maharashtra Live News Update: त्र्यंबकेश्वरमध्ये ऑनलाईन दर्शन पासमध्ये छेडछाड करून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न

Operation Mahadev : लष्कराचं 'ऑपरेशन महादेव' फत्ते; ३ दहशतवादी ठार, पहलगाम हल्ल्याचे संशयित असण्याची शक्यता

Accident: बारामतीत अपघाताचा थरार! ट्रकने वडिलांसह दोन चिमुकल्यांना चिरडलं, थरकाप उडवणारा CCTV VIDEO

मुंबई-पुणे-सोलापूर प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT