Gauri Ganpati : चक्क सुनांना बनवलं गौराई!
Gauri Ganpati : चक्क सुनांना बनवलं गौराई!गजानन भोयर

Gauri Ganpati : चक्क सुनांना बनवलं गौराई!

सुनामध्येच गौराई पाहणाऱ्या सिंधूबाई यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे जिल्हाभरातून त्यांचं कौतुक होत आहे.
Published on

वाशिम : राज्यभरात गौराईचा सण मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने गौराईच्या मुर्त्यांची पूजा करून साजरा केला जातो. मात्र, वाशिम शहरातील सिंधुबाई सोनुने यांनी आपल्या दोन सुनांनाच गौराई म्हणून तीन दिवस पूजा करीत हा सण साजरा केला आहे. त्यामुळे सुनामध्येच गौराई पाहणाऱ्या सिंधूबाई यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे जिल्हाभरातून त्यांचं कौतुक होत आहे.

हे देखील पहा :

वाशिम शहरातील ड्रीम लॅन्ड सिटी येथे राहणार्‍या श्रीमती सिंधुबाई सोनुने यांनी गौरी पूजन सोहळा आपल्या दोन्ही सुनांची पूजा अर्चना करून त्यांना देवी स्वरुपात समजून साजरा केला. जिवंत चालत्या बोलत्या महालक्ष्मींचा अशा प्रकारे सोहळा साजरा करून समजापुढे आदर्श निर्माण केला. हा गौरी पूजन सोहळा पाहण्यासाठी नागरिक एकच गर्दी करीत आहेत. सासू आणि सुना यांच्या मधील सलोखा आणि जिव्हाळा कायम राहावा असा आपला उद्देश असल्याचे सिंधुबाई सोनुने म्हणतात.

Gauri Ganpati : चक्क सुनांना बनवलं गौराई!
Breaking |झोपलेल्या चिमुकलीच्या गळ्याला नागाने वेटोळा घातलेला हा VIDEO पहाच
Gauri Ganpati : चक्क सुनांना बनवलं गौराई!
Breaking Nashik | नाशिकमध्ये महिलेची दुचाकी अडवत, कारमध्ये नेऊन बलात्कार!

आजकाल घराघरात सासू आणि सुनेच भांडण आपण नेहमीच बघतो. मात्र, वाशिम जिल्ह्यात अशी एक सासू आहे. ज्या सासुबाईन आपल्या दोन्ही सुनेच चक्क गौराईच्या मंडपात बसवून त्यांना गौरीच रूप देत गौराई आगमनापासून ते विसर्जनापर्यंत त्यांची पूजा करत सण साजरा केला आहे. सासूबाईच्या या प्रेमाचा आम्हाला अभिमान आहे असं दोन्ही सुनांनी सांगितलं.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com