Supriya Sule News saam tv
महाराष्ट्र

Supriya Sule : लोकसभा निवडणुकीआधीच सुप्रिया सुळेंना मोठा धक्का! प्रवीण मानेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा?

Baramati Lok Sabha Constituency : सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या इंदापूर तालुका प्रचार समितीचे प्रमुख प्रवीण माने महायुतीसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Ruchika Jadhav

सागर आव्हाड

Baramati News :

बारामती लोकसभा मतदारसंघात आज हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळू शकतो. सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख असलेले जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने वेगळी भूमिका मांडणार? अशी चर्चा आहे. अजित पवार यांचे घड्याळ माने आपल्या हातात बांधणार असं म्हटलं जातंय. यावर आज पत्रकार परिषद घेऊन माने आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशात बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद आणि भावजय यांची थेट लढत होणर असल्याने सांऱ्यांचेच या मतदारसंघाकडे लक्ष लागून आहे. मात्र निवडणूक होण्याआधीत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या इंदापूर तालुका प्रचार समितीचे प्रमुख प्रविण माने महायुतीसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

प्रवीण माने सुप्रिया सुळे यांचे इंदापूर तालुक्यातील प्रचार प्रमुख आहेत. शरद पवार गटाच्या पुढील सर्व निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली होणार अशा सूचनाही काही दिवसांपूर्वी देण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रविण मानेंनी सुळे यांच्या प्रचारार्थ बैठका घेणं सुरु केलं होते. मात्र अचानक शरद पवारांच्या सभेला प्रवीण माने व त्यांचे वडील दशरथ माने अनउपस्थित राहिले. त्यामुळे इंदापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली.

त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापुर दौऱ्यावर आले होते, यावेळी त्यांनी सोनई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने यांची भेट घेतली होती. या भेटीवर प्रविण माने यांनी म्हटलं की,"ही कौटुंबिक भेट असून देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमचे जुने संबंध आहेत. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन चहापान व अल्पोपहार घेतला यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार." त्यामुळे आता प्रवीण माने आणि दशरथ माने हे सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Bigg Boss 19' फेम तान्या मित्तलचे साडी प्रेम, पाहा Unseen Photo

Gold Price Today : सोन्याचे भाव पुन्हा वाढले, ग्राहकांना महागाईचा धक्का; जाणून घ्या किती झाली दरवाढ?

माजी उपसरपंच अन् नर्तिकेचे Whatsapp चॅट्स समोर, आयुष्य संपवण्याची दिली होती धमकी

Mumbai Cricket Association: मुंबईत पोहोचली ICC वुमेंस वर्ल्डकप ट्रॉफी; माजी महिला कर्णधारांना MCA कडून खास सन्मान

Jalna News: जालन्यात दोन गटात हाणामारी, वाद मिटवताना शिंदेंच्या आमदाराने एकाला चोपलं; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT