Baramati Lok Sabha Constituency : 7 दिवसांत पाणी द्या, अन्यथा मतदान विसरा; जेजुरी ग्रामस्थांचा बहिष्काराचा इशारा

Water Crisis in Jejuri : सर्व ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा पालिका प्रशासानस दिला. पाण्याच्या कारणावरुन पालिका प्रशासनास जेजुरीकर ग्रामस्थांच्या राेषास सामाेरे जावे लागले.
water scarcity in jejuri women's morcha at nagar palika
water scarcity in jejuri women's morcha at nagar palika saam tv

Baramati Lok Sabha News :

स्वयंपाकाला पाणी नाही, दैनंदिन कामासाठी पाणी नाही...साहेब आम्ही जायचं कुठं? पाण्याचा प्रश्न साेडवा अशी मागणी जेजुरी पालिकेत (jejuri nagar palika) आज (साेमवार) महिलांनी केली. दरम्यान जेजुरीचा पाण्याचा प्रश्न न सुटल्यास लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा जेजुरी ग्रामस्थांनी प्रशासनास दिला आहे.

'साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत पाण्याचे भीषण संकट उभे राहिले आहे. गत १० दिवसांपासून जेजुरीकर नागरिकांना पाणी मिळाले नसल्याने जेजुरीकर नागरिक संतप्त झाले आहेत. आज जेजुरीकर ग्रामस्थांनी विशेषत: महिलांनी पालिकेवर माेर्चा काढला.

water scarcity in jejuri women's morcha at nagar palika
Hingoli Lok Sabha Election 2024 : हिंगोलीची जागा भाजप जिंकून दाखवेल, हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध; मुटकुळेंसह शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला

येत्या सात दिवसांच्या आत पाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही मतदान करणार नाही. सर्व ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा पालिका प्रशासानस दिला. पाण्याच्या कारणावरुन पालिका प्रशासनास जेजुरीकर ग्रामस्थांच्या राेषास सामाेरे जावे लागले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

water scarcity in jejuri women's morcha at nagar palika
APMC Market Vashi : एपीएमसीत मुंबईकरांची पिवळ्या कलिंगडास पसंती, आवक वाढली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com