बारामतीमध्ये २३ वर्षीय तरुणीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ
बॉयफ्रेंडने दिलेली गोळी खाल्ल्यानंतर तरुणीचा मृत्यू
शरीरसंबंध ठेवण्यापूर्वी बॉयफ्रेंडने दिली होती गोळी
तरुणीच्या मृत्यू प्रकरणात बॉयफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल
बारामतीमध्ये २३ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बॉयफ्रेंडने शरीरसंबंध ठेवण्यापूर्वी तरुणीला गोळी खायला दिली होती. ही गोळी खाल्ल्यानंतर तिचा मृत्यू झाला, असा दावा मृत तरुणीच्या आईने केला आहे. बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेले असता तरुणीने आईला फोन करून तिला गोळी खायला देणार असल्याचे सांगितले होते. याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती शहर पोलिस ठाण्यात तरुणाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुणाचे मृत तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. ६ ऑगस्टला ते फिरण्यासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी आरोपीने शरीरसंबंध ठेवण्यापूर्वी तिला गोळी खायला दिला होती. तरुणीने मृत्यू होण्यापूर्वी काही तास आधी आईला फोन करून त्याने तिला गोळी दिली असल्याचे सांगितले होते.
त्याच रात्री अचानक तरुणीची प्रकती बिघडली. त्यानंतर तिला वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असताना तरुणाची मृ्त्यू झाला. तरुणाने दिलेल्या गोळीमुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा तरुणीच्या आईने केला आहे. मृत तरुणीच्या आईने पोलिसांना अशी देखील माहिती दिली की, त्यांची मुलगी गेल्या काही दिवसांपूर्वी सतत शांत राहत होती. त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली होती. तिच्या मैत्रिणीकडून आरोपी तिला गोळ्या खायला देत असल्याचे त्यांना कळाले होते.
तरुणीचा उपचादरम्यान मृत्यू झाला खरा पण तिच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय? तिला कोणत्या गोळ्या खायला दिल्या होत्या याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर कारण समोर आली. या प्रकरणाची वैद्यकीय, रासायनिक, डिजिटल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे. तरुणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कारण समोर आले नाही पण सध्या फक्त तर्क वितर्क केले जात आहेत. सध्या बारामती पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.