Mumbai : सत्ताधाऱ्यांकडून वारंवार महापुरूषांचा होणारा अपमान, वाढती महागाई आणि बेरोजगारी विरोधात शनिवार (१६, डिसेंबर) ला महाविकास आघाडीकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच कॉंग्रेस पक्षाचेही नेते सहभागी होणर आहेत.
या मोर्चात लाखो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा दावा महाआघाडीकडून करण्यात आला होता. मात्र ज्या मार्गावर महाआघाडीचा मोर्चा जाणार आहे. त्याच मार्गावर सुषमा अंधारे यांच्याविरोधात बॅनर लावण्यात आले आहेत. ज्यामध्ये सुषमा अंधारे यांच्यासह उद्धव ठाकरेंवरही टिका करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या भायखळा इथल्या रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून या महामोर्चाची सुरुवात होईल तर सीएसएमटी स्टेशनच्या समोर टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या इथे हा मोर्चा संपेल.हा महामोर्चा ज्या मार्गावरुन जाणार आहे त्याच मार्गावर सुषमा अंधारे यांच्याविरोधात बॅनर लावण्यात आले आहेत.
या बॅनरमध्ये सुषमा अंधारे यांचा फोटो लावण्यात आला असून त्यामध्ये त्यांनी साधू संतांबद्दल केलेली वादग्रस्त वक्तव्य छापण्यात आली आहेत. सोबतच सत्तेसाठी अजून किती लाचार होणार ? हाच का तुमचा हिंदूत्वाचा विचार असे म्हणत उध्दव ठाकरे यांच्यावरही टीका करण्यात आली आहे.
मराठा युवासेनेच्या वतीने ही बॅनरबाजी करण्यात आली असून हे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत. दरम्यान, मुंबईत होणाऱ्या या महामोर्चात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच कॉंग्रेस पक्षाचेही नेते सहभागी होणर आहेत. उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले असे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यामध्ये सहभागी होणार आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.