Satara Bank fraud :  Saam tv
महाराष्ट्र

Bank Fraud : बँकेत महाघोटाळा, तब्बल 195 बोगस कर्ज खाती; माजी अध्यक्षांसह 50 जणांवर गुन्हा, VIDEO

Satara Bank fraud : साताऱ्यातील एका बँकेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झालाय..ही बँक नेमकी कोणती आहे? आर्थिक महाघोटाळा कोणी केला? खातेदारकांच्या तक्रारीत नेमकं काय म्हटलयं? बँकेत घोटाळा कसा झाला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

पश्चिम महाराष्ट्रातील एका बँकेत मोठा आर्थिक घोटाळा समोर आलाय़..रिझर्व बँकेने निर्बंध आणलेल्या आणि ठेवीदारांचे पैसे अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील फलटण मधल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेचे शासकीय लेखापरीक्षण पूर्ण झालं.. आणि बँकेच्या आर्थिक घोटाळ्याची माहिती समोर आलीय.. ज्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ माजलीय...

यशवंत बँकेत तब्बल 112 कोटी 10 लाख 57 हजार 881 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी बँकेचे तत्कालीन चेअरमन शेखर चरेगावकर यांच्यासह 50 जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान 195 बोगस कर्ज खाते असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अनेक सहकारी संस्थांना मार्गदर्शक राहिलेले आणि सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष असलेले शेखर चरेगावकर याच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानं अनेकांच्या भुवय्या उंचावलेत... तसचं फलटण आणि कराडमध्ये बँकेच्या शाखा असल्यानं ठेवीदारांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, यात आणखी काही मोठी नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जातेय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT