pm modi to visit nashik saam tv news
महाराष्ट्र

PM Modi To Visit Nashik : 'ज्यांनी केली शेतमालाची निर्यात बंदी त्यांना नको सत्तेची संधी'; 'प्रहार' ने झळकावले फलक

हा निर्णय मागे घ्यावा यासाठी महिनाभरात राज्यातील विविध जिल्ह्यात कांदा लिलाव बेमुदत बंदची हाक देखील देण्यात आली.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Nashik News :

केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीचा (onion export ban) निर्णयामुळे शेतक-यांमध्ये आजही मोठा रोष दिसून येत आहे. नाशिकच्या चांदवड येथे प्रहार संघटनेने (prahar sanghatana) केंद्राच्या निर्णया विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रहार संघटने तर्फे राहूड येथे पुन्हा कांदा निर्यात बंदी करणा-यांना मतदान बंदीचे फलक लावले आहेत. हे फलक चर्चेचे विषय ठरले आहेत. (Maharashtra News)

केंद्र सरकारने कांद्यावर 31 मार्च 2024 पर्यंत निर्यात बंदी लागू केली आहे. यामुळे राज्यातील विशेषत: नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांचे आणि व्यापाऱ्यांचे माेठे आर्थिक नुकसान झाले आहे. हा निर्णय मागे घ्यावा यासाठी महिनाभरात राज्यातील विविध जिल्ह्यात कांदा लिलाव बेमुदत बंदची हाक देखील देण्यात आली. या निर्णयामुळे एक महिन्याच्या काळात सुमारे ५०० कोटींचे शेतक-यांचे नुकसान झाले आहे

केंद्राने तातडीने कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी हाेत असली तरी केंद्र सरकार त्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यामुळेच आज नाशिकच्या चांदवडच्या प्रहार संघटनेने राहूड येथे पुन्हा कांदा निर्यता बंदी करणा-यांना मतदान बंदीचे फलक लावले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्यांनी केली शेतमालाची निर्यात बंदी त्यांना नको सत्तेची संधी, ज्यांनी केली निर्यात बंदी त्यांना मतदानाची बंदी, जय जवान जय किसान अशा आशायाचे फलक लावण्यात आले आहेत. कांदा निर्यात बंदीमुळे आजही शेतक-यांमध्ये संताप असल्याचे दिसून आले.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नाशिक दाै-याच्या (pm modi to visit nashik) पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी ठिकठिकाणी निर्यात बंदी हटविण्याची मागणी करु लागले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT