Balasaheb Thorat Criticize of CM Eknath Shinde SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : राम लल्ला आज तरी शेतकऱ्यांकडे, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना अयोध्येत भेटणार नाही; थोरातांची टीका

Balasaheb Thorat Criticize of CM Eknath Shinde : राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर आहेत.

भूषण अहिरे

Balasaheb Thorat Criticize Maharashtra Govenrment: राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

काँग्रेसचे नेते बळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आज राम लल्ला अयोध्येत भेटणार नाही आज तरी तो शेतकऱ्यांकडे आहे, असे म्हणत अयोध्या दौऱ्यावर निशाणा साधला आहे.

राम लल्ला आज तरी शेतकऱ्यांकडे - थोरात

बाळासाहेब थोरात म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अयोध्येत आज रामलल्ला भेटणार नाही, राम लल्ला आज तरी शेतकऱ्यांकडे आहे. राज्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या रूपात राम लल्लाचे दर्शन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना झाले असते.

मदत नाकारायची म्हणूनच अटी घातल्या

कांदा अनुदानासंदर्भात ई पीक नोंदणी करण्याची अट राज्य सरकारने घातल्यावरून बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना मदत नाकारायची म्हणून अटी घातल्या अशी टीका देखील थोरात यांनी केली आहे. (Latest Political News)

राऊतांनीही साधला निशणा

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून सत्ताधारी अयोध्येत गेले अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राचे प्रश्न वाऱ्यावर सोडून आपण अयोध्येत गेले आहात. प्रभू श्रीराम तुम्हाला सुबुद्धी देओ असे राऊत म्हणाले. तसेच ''हे सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला निघालं आहे. हे ढोंग असून प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद यांना अजिबात मिळणार नाही'', अशी टीका देखील त्यांनी केली.

Edited By - Cahndra

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: 'विकासकामांचा असली पिक्चर अभी बाकी है', नितीन गडकरी

Curry leaves chutney: कढीपत्त्याची 'ही' चटणी वाढावेल जेवणाची चव

IND vs NZ 2nd Test: सँटनरची 'सुंदर' गोलंदाजी! 7 विकेट्स घेत टीम इंडियाला केलं All Out; न्यूझीलंडकडे मोठी आघाडी

Indrayani: इंदू आणि फंट्या गँगने बनवला मातीचा किल्ला, 'इंद्रायणी' मालिकेत साजरी होणार अनोखी दिवाळी

Camphor Benefits: घरात कापूर पाणी शिंपडल्याने होतात अनेक फायदे!

SCROLL FOR NEXT