Nagpur Bajrang Dal Saam tv
महाराष्ट्र

Bajrang Dal On Valentine Day : 'व्हॅलेंटाईन डे' विरोधात बजरंग दल आक्रमक; 'बाईक रॅली'नंतर 'टेडी' जाळत केला निषेध

Nagpur News: नागपुरात बजरंग दलाने 'व्हॅलेंटाईन डे'च्या विरोधात बाईक रॅली काढून निषेध नोंदवला आहे.

मंगेश मोहिते

नागपूर : व्हॅलेंटाईन डे हा प्रेमिकांचा दिवस आहे. विशेषत: तरुणाई प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याची आतुरतेने वाट पाहत असते. मात्र, याच 'व्हॅलेंटाईन डे'च्या विरोधात बजरंग दलाने आक्रमक भूमिका घेतली आहे. नागपुरात बजरंग दलाने 'व्हॅलेंटाईन डे'च्या विरोधात बाईक रॅली काढून या दिवसाला विरोध दर्शवला आहे. (Latest Marathi News)

नागपुरात (Nagpur) बजरंग दलाने 'व्हॅलेंटाईन डे'चा विरोध करण्यासाठी बाईक रॅली काढली आहे. नागपूरच्या छावणी चौकातून बाईक रॅली काढून 'व्हॅलेंटाईन डे'ला विरोध दर्शवला आहे. बाईक रॅलीत बजरंग दलाच्या शेकडो तरुणांनी सहभाग नोंदवला आहे. बजरंग दलाच्या तरुणांनी हातात भगवे झेंडे घेत जय श्रीरामच्या घोषणा देत आहेत.

बजरंग दलाची बाईक रॅली संविधान चौकात पोहोचल्यानंतर टेडी जाळत 'व्हॅलेंटाईन डे'ला विरोध केला आहे. 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine Day) ही पाश्चात्य संस्कृती असल्याने विरोध करत आहे, बजरंग दलाचे म्हणणे आहे. नागपूर शहराच्या अनेक भागात बजरंग दलाने रॅली नेत संविधान चौकात येऊन टेडी जाळत निषेध केला.

बजरंग दलाचा 'व्हॅलेंटाईन डे' ला विरोध का?

बजरंग दलाचं म्हणणं आहे की, 'व्हॅलेंटाईन डे' साजरा भारतीय संस्कृतीचा हिस्सा नाही. 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करणे ही पाश्चिमात्य संस्कृती आहे. या दिवसात युवक-युवती शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. यामुळे मुलगी गर्भवती होते. नंतर युवती गर्भपात करते. यामुळे समाजावर परिणाम होता'.

'बजरंग दलाचा प्रेमीयुगुलावर आक्षेप नाही. फक्त त्यांचा 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्यावर आक्षेप आहे. 'व्हॅलेंटाईन डे' दिनाला जोडपं बाहेर फिरून साजरा करतं, हे पाश्चिमात्य संस्कृतीला प्रोत्साहन देणारं आहे, असं बजरंग दलाचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: अजित पवारांच्या आमदाराकडून काँग्रेसचा प्रचार, महायुतीतील संघर्ष टोकाला

Chanakya niti: दुपारच्या वेळेस का झोपू नये? चाणक्यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Maharashtra Politics: एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वादामुळे माझं सँडविच होतं, रक्षा खडसे असं का म्हणाल्या?

Viral Video : गाड्या अडवल्या, बोनेटवर बसून धिंगाणा घातला; साताऱ्यात मद्यपी तरुणीचा धिंगाणा, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT