Mumbai Crime : आयआयटीतील विद्यार्थ्याला बनवलं 'लैंगिक गुलाम'; तंत्रविद्येचा वापर करून केला सामूहिक अत्याचार

मुंबईतील आयआयटीतील एका विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे.
crime file photo
crime file photoSaam Tv

Mumbai crime News : मुंबईतून धक्कादायक बातमी हाती आली आहे. मुंबईतील आयआयटीतील एका विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. 'लैंगिक गुलाम' बनवल्याचा आरोप पीडित विद्यार्थ्याने आरोपीवर केला आहे. या प्रकरणी पवई पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी (Student) हा ३३ वर्षांचा असून मुंबईतील आयआयटी संस्थेत शिक्षण घेत आहे. पीडित विद्यार्थी आय. आय. टी. , मुंबईत (Mumbai) पीएचडीच्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी आहे.

विद्यार्थ्याने आपण समलैंगिक असून आपल्यावर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी लैंगिक अत्याचार झाल्याचा तक्रारीत म्हटलं आहे.या प्रकरणी पवई पोलिसांनी हत्येचा प्रयत्न, अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि जादुटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

crime file photo
Crime News: पतीनेच केली पत्नीची निर्घुण हत्या, धक्कादायक घटनेने नालासोपाऱ्यात खळबळ

पीडित विद्यार्थ्याने पोलीस जबाबात काय सांगितलं?

पीडित विद्यार्थ्याने पोलीस (Police) जबाबात सांगितलं आहे की, आरोपी 48 वर्षीय सुभ्रो बॅनर्जी याने लैंगिक शोषण करून त्याच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप केला. यानंतर पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पीडित विद्यार्थ्याचा दावा आहे की, विद्यार्थ्याने आरोपीवर काळी जादू आणि तांत्रिक विद्याचा वापर करत अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्याला त्याच्या मित्रांसोबत अश्लिल कृत्य करण्यास भाग पाडले आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला.

crime file photo
Vasai Crime : कारला अडवलं अन् घात झाला, वाहतूक पोलिसाला दीड किलोमीटर फरफटत नेलं, थरकाप उडवणारा VIDEO

पीडित विद्यार्थ्याने अनेकदा नकार देऊनही आरोपी मेणबत्त्याचे चटके द्यायचा आरोप केला आहे. पवई पोलीसांनी या प्रकरणी कलम ३७७,३७०सह कलम ३ (१) (२) ३०७,५०६ ५०४ भा.दं.वि.महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध व समुळ उच्चाटन करणेबाबत अधिनियम २०१३ सह कलम २७ अंमली पदार्थ विरोधी कायदा ११८५, सह कलम ६७ माहिती तंत्रज्ञानअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com