jalna, maratha reservation, jalna court saam tv
महाराष्ट्र

Jalna Maratha Andolan Case : जालन्यातील 33 मराठा आंदाेलकांना जामीन मंजूर : वकिल संघाची माहिती

लक्ष्मण सोळुंके

Jalna News : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (antarwali sarathi latest updates) येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) उपोषणास बसलेल्या आंदाेलकांची आणि पाेलिसांची धूमश्चक्री झाल्यानंतर सुमारे तीन हजार आंदाेलकांवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यातील 33 आंदाेलकांना आज (मंगळवार) न्यायालयाने जामीन मंजूर केला. (Maharashtra News)

या आंदाेलन काळात पाेलिसांनी आंदाेलकांवर लाठीचार्ज केला. त्याचे पडसाद संपूर्ण जालना जिल्ह्यासह राज्यात उमटले. या प्रकरणी जालना शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात दंगल घडवल्या प्रकरणी आणि पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणी जवळपास तीन हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले.

या प्रकरणी जिल्हा वकील संघाच्या वतीने आंदोलन कार्यकर्त्यावर दाखल गुन्ह्या प्रकरणी मोफत सेवा बजवाण्यात आली. वकील संघाच्या वतीने आज 33 जणांच्या जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.

जिल्हा व सत्र न्यायालयाने सर्वांना जामीन मंजूर केला. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश हाेता. त्याचा जामीन कालच मंजूर केल्याची माहिती वकील संघाने दिली. या सर्वांचा जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आल्याचे वकीलांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Astrology Tips : काही केल्या लग्न जुळत नाहीये? वास्तुशास्त्रात दिलेले 'हे' उपाय एकदा करून तर पाहा

Nashik News: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने वसतिगृहातच संपवलं जीवन; धक्कादायक घटनेनं नाशिकमध्ये खळबळ

Viral Video: डॉक्टर्स ब्रेन ट्यमूर काढत होते, महिला रुग्ण बघत होती ज्युनियर NTR चा सिनेमा, ऑपरेशन थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

SCROLL FOR NEXT