बहाद्दरपूर नावाचं गाव ७० वर्षानंतरही नाही विकासाचं नाव ! विनोद जिरे
महाराष्ट्र

बहाद्दरपूर नावाचं गाव ७० वर्षानंतरही नाही विकासाचं नाव !

स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही विकासापासून कोसो दूर असलेलं प्रगत महाराष्ट्रातील बहाद्दरपूर

विनोद जिरे

बीड - देशाला स्वातंत्र्य मिळून आज 73 वर्ष झाले आहेत. मात्र आजही अशी अनेक गावं, वाड्या-वस्त्या आहेत, की ज्या विकासापासून कोसो दूर आहेत. दळणवळणाचा मोठा प्रश्न आजही गावखेड्यातील नागरिकांसमोर घर करून आहे. यामुळे देशाची वाटचाल महासत्तेकडे होत असताना, ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रवास, आजही चिखलमय आहे. असाच चिखलमय प्रवास पाहून, बीडच्या एका गावात तरुण मुलांना सोयरीक मिळणं देखील मुश्किल झालं आहे. त्यामुळं लोकप्रतिनिधी असणाऱ्या आमदारांनी या रस्त्यावरून एकदा येऊन दाखवावं, आम्ही रस्ताचं मागणार नाही. असं खुल आव्हान या गावच्या ग्रामस्थांनी दिलं आहे.

बीडमधील बहाद्दरपूर हे गाव बीडपासून जवळपास 23 किलोमीटर अंतरावर आहे. गावची लोकसंख्या जवळपास 1500 आहे, तर मतदान 600 च्या आसपास आहे. हे गाव बीड-साक्षळपिंप्री रस्त्यापासून तीन किलोमीटर आत आहे. मात्र जेवढा वेळ 20 किलोमीटर प्रवास करायला लागत नाही. तेवढा वेळ हा 3 किलोमीटर प्रवास करायला लागत आहे.

हे देखील पहा -

कारण हा तीन किलोमीटर रस्ता, अगदी आदिवासी पाड्यावर जाणाऱ्या रस्त्यापेक्षाही दयनीय आहे. पावसाळ्यात या गावकऱ्यांना जेवढी कसरत शेतात काम करायला लागत नाही. तेवढी कसरत या रस्त्यावरून ये-जा करतांना करावी लागत आहे. आज गावातील लहान मुलं, विद्यार्थी, आजारी रुग्ण, गरोदर महिला यांना वर्षानुवर्षं चिखलमय प्रवास करावा लागतोय. अनेकांचे यावरून जातांना अपघात देखील झाले आहेत. दररोज कुणीतरी दुचाकीवरून जातांना पडतात. तर विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावात जातांना सायकलवरून हा चिखलमय प्रवास करावा लागतोय. याविषयी अनेक वेळा प्रशासनकडे तक्रारी केल्या, लोकप्रतिनिधींना सागितलं मात्र कुणीच दखल घेतली नाही.

तर या गावातील पोपट वाघमोडे म्हणाले की, माझं वय आज 48 वर्षे सुरू आहे. मी ज्यावेळी अकरा वर्षाचा होतो त्यावेळेस पासून शाळेत जाताना चिखल तुडवत आम्ही गेलो होतो. मात्र आजही जैसे थे परिस्थिती आहे. आज अनेक मुलांचे शिक्षण या रस्त्यामुळं बंद झालेले आहेत. याविषयी अनेक वेळा आम्ही आमदार संदीप क्षिरसागर, जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे मागणी केलेली आहे. अनेक वेळा विविध नेत्यांना याविषयी रस्त्याची मागणी केलीय. मात्र या लोकांनी आमच्याकडे लक्ष दिले नाही.

तर याविषयी अशोक कोळेकर म्हणाले की, 35 वर्षापासून कोणाचा हात मोड-पाय मोड झालेला आहे. एखादं डिलिव्हरी पेशंट असेल तर जीव निघून जायची वेळ येते. त्यामुळे अडचण निर्माण होते. जर एखादा सोयरा आला गावाला, तर पोरगी द्यायला सुद्दा राजी नाही. आज अनेक मुलं लग्नाविना पडले आहेत ते केवळ या रस्त्यामुळं! आज गावाला पाण्याची समस्या आहे, लाईटची समस्या आहे. यासह अनेक समस्या असल्यामुळे ही परिस्थिती गावावर ओढावली आहे. अशी खंत देखील व्यक्त केली आहे.

तर याविषयी गावातील महिला म्हणाल्या, की माझ्या डोळ्याचे ऑपरेशन झालं आहे. कुठे जाता येत नाही, मुलं लहान आहेत. जर ते आजारी पडले तर या रस्त्यामुळे त्यांना हॉस्पिटल मध्ये घेऊन जाता येत नाही. या रस्त्यावरून आम्हाला चालता येत नाही. रस्ता खराब असल्यामुळे आमची मुलं शाळेत शिकायला देखील नको म्हणत आहेत. त्यामुळे आम्हाला रस्ता करून द्यावा. अशी मागणी ग्रामस्थ महिलांनी केली आहे.

तर याविषयी शिवराम शिवगिरे म्हणाले, की गेल्या 70 वर्षांपासून आमच्या बहादरपूर गावच्या रस्त्याची दयनीय अवस्था आहे. आमच्या मुलांना शाळेत जाणे मुश्कील झाले आहे. प्रत्येक पावसाळ्यात असाच चिखलमय प्रवास करावा लागतोय. मुलांना शाळेत जाताना सायकल वर जाता येत नाही. त्यामुळे आम्ही लोकप्रतिनिधींकडे या रस्त्याची अनेक वेळा मागणी केली आहे. मात्र लोकप्रतिनिधी देखील रस्ता करायला तयार नाहीत.

त्याचबरोबर तहसीलदार, कलेक्टर यांच्याकडे देखील मागणी केलेली आहे. त्याचा अनेक वेळा पाठपुरावा केला आहे, तरी देखील त्यांनी रस्ता केला नाही. यामुळे आमचं विद्यमान आमदार संदीप क्षिरसागर यांना एक आव्हान आहे, त्यांना मी चॅलेंज करतो, की त्यांनी आमच्या गावचा रस्ता नाही केला तरी चालेल. "त्यांनी या रस्त्यावरून माझ्या घरी येऊन एकदा चहा पिऊन दाखवावं" असं खुल आव्हान शिवगिरे यांनी संदीप क्षीरसागर यांना केलं आहे.

दरम्यान पायाभूत सुविधा मिळणे हे प्रत्येक व्यक्तीचा अधिकार असताना, बीडच्या बहादरपूरमध्ये आजही रस्त्या विना नागरिकांचा चिखलमय प्रवास सुरू आहे. यामुळे विद्यार्थी, आजारी रुग्ण, गरोदर महिलांसह ग्रामस्थांना, एक ना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. एवढंच नाही तर या गावातील तरुण मुलांना सोयरीक देखील मिळणं मुश्किल झालं आहे. यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गावचा रस्ता आतातरी करणार ? कि आमदार संदीप क्षिरसागर (Sadeep Kshirsagar) या ग्रामस्थांचं खुलं आव्हान स्वीकारणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT