चिपळूणकरांच्या वैद्यकीय सेवेस्तव सिव्हील डिफेन्सची टिम दाखल

चिपळूणकरांच्या वैद्यकीय सेवेस्तव मुंबईहून सिव्हील डिफेन्सच्या डॉक्टरांची टीम दाखल झाली असून एकूण २५ स्वयंसेवक या टीम मध्ये आहेत.
चिपळूणकरांच्या वैद्यकीय सेवेस्तव सिव्हील डिफेन्सची टिम दाखल
चिपळूणकरांच्या वैद्यकीय सेवेस्तव सिव्हील डिफेन्सची टिम दाखल अमोल कलये
Published On

चिपळूण : मागील ५ दिवसांपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसाने अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आणि यासोबतच अनेकांचे संसार सुद्धा ! संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाने रौद्ररूप धारण केल्याचे मागील ५ दिवसात पहायला मिळाले. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली आहे. घरांचे, मालमत्तेचे व पशुधनासह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

सर्वप्रथम पुराचा मोठा फटका चिपळूणकरांना बसला आहे. मात्र ओसरणाऱ्या या पुरासह चिपळूणकर सावरत आहेत. पुरानंतर साठलेल्या चिखल, कचरा व अन्य बाबींमुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची शक्यता असते. याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून आज चिपळूणकरांच्या वैद्यकीय सेवेस्तव मुंबईहून सिव्हील डिफेन्सच्या डॉक्टरांची टीम दाखल झाली असून एकूण २५ स्वयंसेवक या टीम मध्ये आहेत.

या पुरामध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या तक्रारी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सिव्हील डिफेन्सच्या डॉक्टरांनी स्थानिकांच्या आरोग्यतपासणी करून औषधोपचारास सुरुवात केली आहे.

पहा फोटो -

चिपळूण
चिपळूण अमोल कलये
चिपळूण
चिपळूण अमोल कलये
चिपळूण
चिपळूण अमोल कलये

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com