Nagpur, Crime News saam tv
महाराष्ट्र

Nagpur News: छापरूनगर परिसरातून भरदिवसा नऊ लाखांची बॅंग चाेरीस; लकडगंज पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

मंगेश मोहिते

Nagpur Crime News : भरदिवसा नऊ लाख रुपयांच्या पैश्याची बॅग लुटून नेण्याचा प्रकार नागपूर (nagpur) शहरात घडला आहे. या घटनेची नाेंद लकडगंज पाेलिस ठाण्यात (Lakadganj Police Station) झाली आहे. पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार छापरूनगर भागात असलेल्या एका बँकेतून (bank) कोळसा व्यापाराच्या कर्मचाऱ्यांने पैसे काढले हाेते. या पैशांची बॅग त्याने दुचाकीवर ठेवली. दरम्यानच्या काळात त्याच्या पाठीमागून आलेल्या दोन दुचाकीधारकांनी त्याला लाथ मारून खाली पाडले. (Maharashtra News)

त्यानंतर दोघांनी पैशांची बॅग घेत घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेची माहिती लकडगंज पोलिसांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे त्यांनी पंचनामा करीत आसपासच्या नागरिकांकडून घटनेची माहिती घेतली.

पोलीस उपायुक्त गोरख भामरे यांनी दिलेल्या माहितीनूसार अनिल नागोत्रा हे एन. के. अग्रवाल हा कोळसा व्यापा-याकडे काम करतो. त्याने बॅंकेतून पैसे काढल्यानंतर त्याला लुटण्यात आले. सीसीटीव्हीच्या आधारे काही धागेदाेरे हाती लागले आहेत. त्या आधारे आराेपींचा शोध सुरू आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मशाली'वर निवडून आले, पण आदेश मोडले; बेपत्ता ४ नगरसेवकांवर ठाकरेंचा निलंबनाचा इशारा

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तर घडणार; ५ राशींच्या लोकांनी घराबाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नये, अन्यथा...

अमेरिकेचा इराणवरील हल्ल्याचा सिक्रेट प्लॅन? अमेरिका-इराणमध्ये महायुद्ध पेटणार?

काँग्रेस-MIMच्या नगरसेवकांमध्ये राडा, अकोल्यात भाजपचाच महापौर

SCROLL FOR NEXT