Badlapur News  saam tv
महाराष्ट्र

Badlapur : पेट्रोलपंपात पेट्रोलमध्ये मिसळलं पाणी ? बदलापूरमधील घटना

बदलापुरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदलापुरातील एका पेट्रोलपंपावर पेट्रोलमध्ये चक्क पाणी मिसळल्याचं प्रकार समोर आला आहे.

अजय दुधाणे

बदलापूर : बदलापुरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदलापुरातील एका पेट्रोलपंपावर पेट्रोलमध्ये चक्क पाणी मिसळल्याचं प्रकार समोर आला आहे. त्यानंतर ग्राहकांनी पेट्रोलपंपावर एकच गर्दी केली. त्यानंतर अतिवृष्टीमुळे हा प्रकार घडल्याचं पेट्रोलपंप व्यवस्थापकांकडून सांगण्यात आलं. ( Badlapur News In Marathi)

बदलापूर (Badlapur) पूर्वेच्या कात्रप परिसरात एचपी कंपनीचा पेट्रोलपंप आहे. या पेट्रोलपंपाच्या पॉवर पेट्रोलच्या टाकीत काल झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी मिसळलं. त्यामुळं काल इथून पेट्रोल भरून गेलेल्या १० ते १२ ग्राहकांच्या टाकीत पाणीमिश्रित पेट्रोल भरलं गेल्यानं गाड्या बंद पडण्याचे प्रकार घडले.

ग्राहकांनी पेट्रोल काढून पाहिलं असता त्यात पाणी असल्याचं लक्षात आल्यानं ग्राहकांनी हे पेट्रोल घेऊन पेट्रोलपंप गाठला. त्यावेळी सर्व ग्राहकांनी एकत्र येत पेट्रोलपंप व्यवस्थापकला घेरलं. त्यांनी ग्राहकांची समजूत काढली. त्यानंतर पेट्रोलपंपाकडून या ग्राहकांच्या गाड्यांची दुरुस्ती करून देत त्यांना मोफत पेट्रोल देण्यात आलं.

सध्या टाकीत पेट्रोलच्या टाकीत पाणी नसून पाणी नेमकं कुठून गेलं, याचा शोध सुरू असल्याचं पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक कुलदीप तिवारी यांनी सांगितलं. तसंच आणखी कुणाला असा त्रास असल्यास त्यांनी पेट्रोलपंप व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलं.

पाणीमिश्रित पेट्रोल मिळाल्याने ग्राहकांना राग अनावर झाला होता. मात्र, पेट्रोलपंप व्यवस्थापनाकडून परिस्थिती योग्यप्रकारे हातळल्याने आणि ग्राहकांना सहकार्य केल्याने ग्राहकांचा राग शांत झाला. तसेच आणखी कुणाला असा त्रास झाल्यास त्यांनी पेट्रोलपंप व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha : भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी केली काळी दिवाळी; सरकारचा निषेध करत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मविआचे धरणे

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gauri Nalawade Photos: कानात झुमके अन् गुलाबी साडी... अभिनेत्री गौरी नलावडेचं सौंदर्य, लेटेस्ट फोटो पाहा

Reliance Diwali Offer : रिलायन्स डिजिटलची फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऑफर; मोफत गिफ्ट्स आणि मोठ्या सवलती!

Sanjay Raut : राष्ट्रवादीचे ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर, संजय राऊतांनी शब्दाचे फटाके फोडले; म्हणाले, अजित पवार...

SCROLL FOR NEXT