Expressway Saam tv
महाराष्ट्र

New Expressway: बदलापूरला मिळणार नवा महामार्ग, ६०० किमीचा प्रवास एका झटक्यात होणार

Badlapur to Latur New Expressway: हिवाळी अधिवेशनात बदलापूर–लातूर द्रुतगती महामार्गाला मंजुरी मिळाली आहे. बदलापूर व मुरबाड परिसरासाठी मलशुद्धीकरण केंद्र, अंडरग्राऊंड विद्युत वाहिनी आणि अन्य विकासकामांना मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

मयुरेश कडव, बदलापूर प्रतिनिधी

Badlapur Latur expressway approved : नागपूर इथं झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुरबाड आणि बदलापूर परिसरासाठी विविध विकासकामे मंजूर करण्यात आली. यामध्ये बदलापूर–लातूर या द्रुतगती महामार्गाला मंजुरी मिळाली. त्यामुळे आता बदलापूर शहराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. तसेच या अधिवेशनात बदलापूर शहरातील मलशुद्धीकरण केंद्रासाठी तब्बल 303 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. नागपूरच्या धर्तीवर बदलापूरमध्ये अंडरग्राऊंड विद्युत वाहिनी उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुरबाड शहरासाठी 115 कोटी रुपयांचं मलशुद्धीकरण केंद्र मंजूर झालं. तसच बदलापुरात 25 कोटी रुपये खर्च करून शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. ठाण्याच्या धर्तीवर बदलापुरात भव्य दीपस्तंभ आणि 111 फुटी महादेवाची भव्य मूर्ती उभारण्यासही मान्यता देण्यात आली आहे. या सर्व मंजूर विकासकामांची माहिती आमदार किसन कथोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हिवाळी अधिवेशनात मुरबाड विधानसभा मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात विकासनिधी मंजूर करण्यात आला आहे. मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुरबाड आणि बदलापूर परिसरासाठी भरघोस निधी दिला असून अनेक महत्त्वाची विकासकामे मंजूर झाली आहेत. यामध्ये बदलापूर–लातूर–हैदराबाद महामार्ग मार्गी लागला आहे. बदलापूर शहरातील मलशुद्धीकरण केंद्रासाठी तब्बल 303 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली असून, नागपूरच्या धर्तीवर बदलापूरमध्ये अंडरग्राऊंड विद्युत वाहिनी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुरबाड शहरासाठी 115 कोटी रुपयांचे मलशुद्धीकरण केंद्र मंजूर झाले आहे. तसेच बदलापुरात 25 कोटी रुपये खर्च करून शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. ठाण्याच्या धर्तीवर बदलापुरात भव्य दीपस्तंभ आणि 111 फुटी महादेवाची भव्य मूर्ती उभारण्यासही मान्यता देण्यात आली आहे. या सर्व मंजूर विकास कामांची माहिती आमदार किसन कथोरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली. यावेळी बोलताना कथोरे म्हणाले की, येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचाच नगराध्यक्ष निवडून येईल आणि भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC Vima Sakhi : LIC ची जबरदस्त योजना! महिलांना दर महिन्याला मिळणार ₹७०००, अट फक्त १०वी पास

Maharashtra Live News Update: अमरावती शहरात मतदारसंख्येत मोठी वाढ

Weather Forecast: आजचे हवामान! ५ राज्यांना पावसाचा इशारा, तर १८ शहरावर दाट धुक्याचे सावट, महाराष्ट्रात काय स्थिती?

आज निर्णय घेतलात तर बदलू शकतं भविष्य! १७ डिसेंबरचं पंचांग काय सांगतं?

Daily Walking: दररोज फक्त इतकंच चाला, राहाल फिट अँड फाइन; ढिगभर फायदे आणि आयुष्यही वाढेल

SCROLL FOR NEXT