Badlapur Crime Saam tv
महाराष्ट्र

Badlapur Crime : लग्नात भेट देण्यासाठी चक्क चोरला टीव्ही; इलेक्ट्रॉनिक्स दुकानातच केला हात साफ

Badlapur News : दुकानात वेगवेगळ्या कंपनीचे टीव्ही बघितले. सगळ्यांच्या किंमती विचारल्या. हे झाल्यानंतर दुकानदार व नोकरांची नजर चुकवत या चोरट्याने ३२ इंची एलईडी टीव्ही लंपास केला

अजय दुधाणे

बदलापूर : लग्नात भेट देण्यासाठी मोठमोठ्या वस्तू खरेदी करून दिल्या जात असतात. मात्र लग्नात भेट (Badlapur) देण्यासाठी एकाने चक्क दुकानातूनच टीव्ही चोरीला नेल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार बदलापूरमध्ये घडला आहे. (Live Marathi News)

बदलापूरच्या बेलवली परिसरात माऊली इलेक्ट्रॉनिक्स दुकान आहे. दरम्यान या दुकानात ६ फेब्रुवारीच्या रात्री एक व्यक्ती दुकानात टीव्ही खरेदी करण्यासाठी आला होता. त्याने दुकानात वेगवेगळ्या कंपनीचे टीव्ही बघितले. सगळ्यांच्या किंमती विचारल्या. हे झाल्यानंतर दुकानदार व नोकरांची (Theft) नजर चुकवत या चोरट्याने ३२ इंची एलईडी टीव्ही लंपास केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बिल बनवत असतानाच झाला पसार 

दुकानातील नोकर एका टीव्ही खरेदीचे बिल बनवत असताना या चोरट्याने संधी साधली व टीव्ही घेऊन पसार झाला. ही संपूर्ण घटना दुकानात असलेल्या (CCTV) सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valache Birde Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचा वालाचा बिरडा कसा बनवायचा?

Kalyan : कल्याणमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर; नशखोरांची घरात घुसून दुकानदार दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Live News Update : पनवेलजवळ मालगाडी रुळावरून घसरली; रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत

कल्याण-डोंबिवलीकरांनो सावध राहा; ग्रामीण पट्ट्यात बिबट्याची एन्ट्री, नागरिक दहशतीत

राज्यातील सर्व शाळा उद्या बंद; पुण्यात उद्या शिक्षक शिक्षकेतर संघटनेचा एल्गार

SCROLL FOR NEXT