Wangani- Badlapur Highway Saam tv
महाराष्ट्र

Wangani- Badlapur Highway : वांगणी- बदलापूर राज्य महामार्गावर खड्डे; ठेकेदाराच्या दिरंगाईने वाहन चालकांना त्रास

Badlapur News : गेल्या वर्षभरापासून कल्याण- कर्जत या राज्य महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. आतापर्यंत बदलापूर ते गोरेगाव रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र गोरेगाव ते डोणे दरम्यानच्या कॉंक्रिटीकरणात ठेकेदाराकडून मोठी दिरंगाई होत आहे.

Rajesh Sonwane

मयुरेश कडव
बदलापूर
: कल्याण- कर्जत राज्य महामार्गावर वांगणी जवळ खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना धुळीतून प्रवास करावा लागत आहे. तर ठेकेदाराची दिरंगाई आणि सरकारी यंत्रणेचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

गेल्या वर्षभरापासून कल्याण- कर्जत या राज्य महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. आतापर्यंत बदलापूर ते गोरेगाव रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र गोरेगाव ते डोणे दरम्यानच्या कॉंक्रिटीकरणात ठेकेदाराकडून मोठी दिरंगाई होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराने जुना डांबरी रस्ता देखील जागोजागी खोदून ठेवला आहे. परिणामी वाहन चालकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. 

महामार्गाच्या कामासाठी आणलेली खाडी बऱ्याच ठिकाणी ठेकेदाराने पसरवून ठेवली आहे. त्यामुळे याठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय महामार्गाच्या कामासाठी साहित्य आणण्यासाठी अवजड वाहने वापरत आहेत. या वाहनांमुळे महामार्गावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास अन्य वाहन धारकांना होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

महामार्गाचे काम संथगतीने 

विशेष म्हणजे या रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मौन बाळगून गप्प आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या दूरवस्थेला ठेकेदाराची अनास्था आणि सरकारी बाबूंचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. तसेच रस्त्याचे सुरु असलेले काम लवकरात लवकर करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT