Badlapur News Saam tv
महाराष्ट्र

Badlapur : अमेरिकेसह जगभरात ३३ रुपयांत मिळणार मेड इन इंडिया 'देवाभाऊ' चष्मा; काठमांडूतील जागतिक परिषदेत शिक्कामोर्तब

Badlapur News : अंधत्व निवारण मोहिमेअंतर्गत डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शनाखाली नेपाळच्या काठमांडूमध्ये आयएपीबी अर्थात जागतिक अंधत्व निवारण संस्थेमार्फत तीन दिवसीय शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती

Rajesh Sonwane

मयुरेश कडव 
बदलापूर
: नेपाळच्या काठमांडूमध्ये पार पडलेल्या जागतिक परिषदेत बदलापूरच्या 'देवाभाऊ' चष्म्यावर जगातील सर्वात स्वस्त चष्मा म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. 'देवाभाऊ' चष्म्याच्या रूपात जगाला महाराष्ट्राची मोठी भेट मिळाली आहे. या परिषदेत बदलापूरच्या व्हिजन फ्रेंड साकिब गोरे या सामाजिक संस्थेने सादर केलेला ३३ रुपयांतील 'देवाभाऊ' चष्मा आता अमेरिकेसह १४० देशांमध्ये पोहोचणार आहे.


अंधत्व निवारण मोहिमेअंतर्गत डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शनाखाली नेपाळच्या काठमांडूमध्ये आयएपीबी अर्थात जागतिक अंधत्व निवारण संस्थेमार्फत तीन दिवसीय शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. परिषदेत १४० देशांचे ७०० हून अधिक प्रतिनिधींसह बदलापूरच्या व्हिजन फ्रेंड साकीब गोरे या सामाजिक संस्थेचा देखील सहभाग होता. संस्थेने सादर केलेला ३३ रुपयांतील चष्मा चर्चेचा विषय ठरला.

व्हिजन फ्रेंड साकिब गोरे यांच्या स्टॉलला भेट दिली असता किंमत ऐकून आश्चर्य देखील व्यक्त केलं. आयएबीपीच्या अध्यक्षा कॅरोलीन केसी, सीईओ पीटर हॉलंड,  युनायटेड नेशन्सचे ॲम्बेसिडर वेबसन, डब्ल्यूएचओचे स्टुअर्ड किल आणि इतर मान्यवरांनीही स्टॉलला भेट देऊन हा जगातील सर्वात स्वस्त चष्मा असल्यावर शिक्कामोर्तब केले. व्हिजन फ्रेंड साकिब गोरे या संस्थेने ३३ रुपयांपासून २६० रुपयांपर्यंत देवाभाऊ चष्म्याची सीरिज बनवली आहे. 

१४० देशात बदलापूरच्या डंका 

आता काठमांडूतल्या समीटनंतर अमेरिका, आफ्रिकन खंडातील देश, फिलिपाईन्स, सिंगापूर, इथिओपिया, दक्षिण कोरिया, आशियाई तसंच आखाती देशांसह जवळपास १४० देशांमध्ये ०.३८ डॉलर म्हणजेच ३३ रुपयांतील चष्मा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला. यानिमित्तानं बदलापूरसह महाराष्ट्राचा डंका जगभरात वाजणार आहे.

कोण आहेत साकिब गोरे?
साकिब गोरे हे बदलापुरातील सामाजिक कार्यकर्ते असून हमाल ते यशस्वी उद्योजक असा त्यांचा प्रवास राहिला आहे. अत्यंत गरिबीतून वर आलेल्या साकिब गोरे यांच्या बालमनावर लहानपणी दोन प्रसंग कोरले गेले. त्यांच्या कुटुंबातील दोन वृद्धांना आलेलं अंधत्व आणि त्यातून त्यांना झालेला त्रास साकिब यांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेला. त्यांनी १९९२ पासून दृष्टीहिनांसाठी सामाजिक कार्य करायला सुरुवात केली. या कार्यात आमदार किसन कथोरे यांनी त्यांना मोठं पाठबळ दिलं. जवळपास २७ लाख लोकांची मोफत नेत्र तपासणी, १६ लाख मोफत चष्मे वाटप, ६३ हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया असा सामाजिक उपक्रम ते मागील ३४ वर्षांपासून राबवत आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT