Nandurbar Water Shortage : नंदुरबार शहरावर पाणी संकटाची टांगती तलवार; आंबेबारा धरणांने गाठला तळ

Nandurbar News : वाढती उष्णता यामुळे होणारे बाष्पीभवनातून विरचक्रमधील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. महिन्याभरात ६ ते ७ टक्के पाणीसाठा घटला असून सद्यस्थितीत ५६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे
Nandurbar Water Shortage
Nandurbar Water Shortagesaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यात पाण्याचे भीषण संकट निर्माण झाले असताना आता नंदुरबार शहरावर देखील पाणी संकटाची टांगती तलवार आहे. कारण धरणाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा करणाऱ्या आंबेबारा धरणाने तळ गाठला असून पाणी कपात करण्यास सुरवात झाली आहे. आजपासून शहरात दोन दिवसांआड पाणी पुरवठा करण्यात येणार असून आगामी काही दिवसात हि समस्या अधिक गडद होण्याची शक्यता आहे.   

नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आंबेबारा धरणातील स्त्रोत बंद झाल्याने आता शहराला पाणीपुरवठा करण्याचा पूर्ण भार विरचक धरणावर आहे. त्यातच वाढती उष्णता यामुळे होणारे बाष्पीभवनातून विरचक्रमधील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. महिन्याभरात ६ ते ७ टक्के पाणीसाठा घटला असून सद्यस्थितीत ५६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. असे असले तरी भविष्यातील टंचाई लक्षात घेता पालिकेकडून पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Nandurbar Water Shortage
Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या

दोन दिवसांआड मिळणार पाणी 

नंदुरबार शहरातील लोकसंख्या अंदाजित १ लाख ४२ हजार ६३२ एवढी आहे. त्यानुसार नंदुरबारकरांना ११.५ एमएलटी पाणी लागते. अर्थात जवळपास १ कोटी ९० लाख लिटर पाण्याची आवश्यकता नंदुरबारकरांना आहे. सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. तर आजपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. आता दोन दिवसाआड पालिकेकडून ५० मिनीटांसाठी पाणीपुरवठा केला जाणार आहे

Nandurbar Water Shortage
Pune Police : पुण्यातून ६४ गांजा जप्त; धुळे आणि ओडिसा येथील तरुण ताब्यात

पाणी जपून वापरण्याचे आवाहन 

आता एक दिवसाआड ऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नंदुरबार पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे. समाधानकारक पाऊस झाल्यास यातून दिलासा मिळणार आहे. मात्र खबरदारी म्हणून पालिकेने आतापासूनच दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com