Badlapur Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Badlapur Heavy Rain : बदलापूरात सकाळपासून ३८ मिलिमीटर पाऊस; सखल भागात शिरले पाणी, शनीनगरातील लोखंडी पूल वाहिला

Badlapur News : मुसळधार पावसामुळे बदलापुरात कल्याण- कर्जत राज्य महामार्गावर पाणी साचले आहे. तर जुवेली गावाजवळ पाणी तुंबल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हीच परिस्थिती शहरातील अनेक भागात आहे

Rajesh Sonwane

मयुरेश कडव 
बदलापूर
: मुंबई, ठाणे जिल्ह्यात राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. यात बदलापुरात देखील सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून आतापर्यत शहरात ३८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कात्रप, हेंद्रेपाडा, बदलापूर रेल्वे स्थानक परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे. मात्र शहरातून वाहणारी उल्हास नदी अजूनही इशारा पातळी खालून वाहत आहे. 

बदलापूर शहर परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले असून नदी व नाल्यांना देखील मोठा पूर आल्याचे पाहण्यास मिळत आहे. शहरातून वाहत असलेली उल्हास नदीने अद्याप धोक्याची पातळी ओलांडली नसली तरी असाच पाऊस सुरू राहिल्यास नदीचा पाणी प्रवाह इशारा पातळीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 

पालिका प्रशासन लक्ष ठेवून 

सध्या उल्हास नदीचे पाणी १४.५० मीटरवर आहे. नदीची इशारा पातळी ही १६.५० मीटर तर धोक्याची पातळी ही १७.५० मीटर आहे. या अनुषंगाने पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी उल्हास नदीवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सतर्कता म्हणून पालिका प्रशासनाने अग्निशमन दलाला २४ तास सज्ज राहण्यास सांगितले आहे. तसेच दोन हजार नागरिकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली असल्याचं मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सांगितले. 

शनीनगरातील लोखंडी पूल गेला वाहून
बदलापुरातील हेंद्रेपाडा परिसरातील शनीनगर भागातील नाल्यावरील लोखंडी पूल पुरात वाहून गेला. गेल्या काही दिवसांपासून या नाल्यावर नवीन पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात हा पूल बांधण्यात आला होता. मात्र आज नाल्याला आलेल्या पाण्यामुळे लोखंडी पूल वाहून गेला. हा पूल वाहून जातांनाचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पूल बंद करण्यात आल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेस उमेदवाराची कमाल, डिपॉझिट म्हणून चिल्लर भरली; निवडणूक अधिकारीही चक्रावले|VIDEO

Maharashtra Live News Update: पुणे -बंगळुरू महामार्गावर भयंकर अपघात, कंटेनरची एकमेकांना धडक

Yami Gautam: कॉन्ट्रास्ट फॅशनचा नवा ट्रेंड, कश्मिरी ब्यूटी यामी गौतमचा पिंक ड्रेस लूक व्हायरल, पाहा PHOTO

Mahalaxmi Rajyog 2025: भूमिपुत्र मंगळ बनवणार पॉवरफुल योग; 'या' ३ राशींच्या व्यक्तींवर पडणार नोटांचा पाऊस

ED चं खोटं पत्र, अर्थमंत्र्यांच्या नावानं वॉरंट; पुण्यातल्या महिलेची ९९ लाखांची फसवणूक

SCROLL FOR NEXT