Badlapur News Saam TV
महाराष्ट्र

Badlapur News: रात्री ११ वाजता बाल्कनीत उभी होती तरुणी; स्विमिंग पूलकडे लक्ष गेलं अन् धावतच सुटली...

Badlapur News: १८ वर्षीय तरुणी रात्री ११ वाजेच्या सुमारास सोसायटीच्या बाल्कनीमध्ये उभी होती. अचानक तिचं लक्ष समोर असलेल्या स्विमिंग पूलकडे गेलं. तेव्हा तिला समोर दिसलेलं चित्र भयानक होतं.

साम टिव्ही ब्युरो

Badlapur News : १८ वर्षीय तरुणी रात्री ११ वाजेच्या सुमारास सोसायटीच्या बाल्कनीमध्ये उभी होती. अचानक तिचं लक्ष समोर असलेल्या स्विमिंग पूलकडे गेलं. तेव्हा तिला समोर दिसलेलं चित्र भयानक होतं. स्विमिंग पूलमध्ये ३ वर्षीय चिमुकली बुडत असल्याचं तिला दिसलं. हा प्रकार तिच्या लक्षात घेताच ती जीवाच्या आकांताने स्विमिंगपूलकडे धावली आणि तिने या चिमुकलीचा जीव वाचवला. त्यामुळं सर्व स्तरातून तिचं कौतुक होत आहे. (Latest Marathi News)

बदलापूर (Badlapur News) येथील तुळसी विहार सोसायटीत रविवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. अंशिका असं तीन वर्षीय चिमुकलीचं नाव असून निधी उमरानिया असं देवदूत म्हणून धावणाऱ्या १८ वर्षीय तरुणीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३ वर्षीय अंशिका रविवारी रात्रीच्या सुमारास स्विमिंग पूलजवळ खेळत होती.

अचानक खेळत असताना तिचा पाय घसरला आणि ती थेट स्विमिंग पूलमध्ये कोसळली. त्याचवेळी घराच्या बाल्कनीमध्ये उभ्या असलेल्या निधी उमरानिया या तरुणीने अंशिकाला स्विमिंग पूलमध्ये पडलेले पाहिले. तेव्हा ती तातडीने सोसायटीच्या कंपाउंडमध्ये आली. तिने स्विमिंग पूलमध्ये उडी मारुन अंशिकाला पाण्याच्या बाहेर काढले. मात्र, तेव्हा ती बेशुद्धावस्थेत होती. तेव्हा निधीने तिला सीपीआर देत शुद्धीवर आणले. (Breaking Marathi News)

अंशिकाचं सर्वस्तरातून होतंय कौतुक

दरम्यान, अंशिकाचा जीव वाचवल्यानंतर निधीचं सर्वस्तरातून कौतुक होत आहे. याबाबत माहिती देताना निधी म्हणाली, "मी माझ्या घराच्या बाल्कनीमध्ये उभी होते. त्याचवेळी आमच्याच सोसायटीत राहणाऱ्या मुलीला मी पूलमध्ये पाहिले. पण तेव्हा ११ वाजले होते. इतक्या रात्री तिला पूलमध्ये पाहून मला आश्चर्य वाटले. म्हणून मी माझ्या वडिलांना सांगितले. पण थोड्याचवेळात मला पूलमध्ये कोणतीच हालचाल जाणवली नाही".

"तेव्हाच मला थोडी शंका आली की ती बुडतेय. म्हणून मी क्षणाचाही विलंब न करता धावतच खाली उतरले व स्विमिंग पूलमध्ये उडी घेत तिला बाहेर काढले.आंशिकाला बाहेर काढल्यानंतरही ती कोणतीच हालचाल करत नव्हती. म्हणून मी ओटीपोटावर दाब देत पोटातून पाणी बाहेर काढायला सुरुवात केली. मात्र, तरीही आंशिका काहीच हालचाल करत नव्हती".

"शेवटी मी तिचं नाक दाबून तोंड उघडलं आणि तोंडाने श्वास दिला. त्यानंतर तिने डोळे उघडले. त्यानंतर माझ्या वडिलांच्या आणि आमच्या एका शेजाऱ्यांच्या मदतीने आम्ही तिला रुग्णालयात दाखल केले. ती दोन दिवस रुग्णालयात होती. तिला शनिवारी डिस्चार्ज जेण्यात आला", असंही निधीने सांगितलं.

दरम्यान, पाणीटंचाईमुळे सोसायटीतील स्विमिंग पूल बऱ्याच कालावधीपासून बंद होता. मात्र, उन्हाळा वाढल्यामुळं आम्ही नुकताच पूल सुरु केला होता, अशी माहिती सोसायटीच्या सेक्रेटरींनी दिली आहे. त्याचबरोबर ही घटना घडली तेव्हा नुकताच पूल सुरू केल्यामुळं तिथे सिक्युरिटी गार्ड नव्हते तसंच, आजूबाजूला माणसंही कमी होते, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : पुणे हादरलं !सासरवाडीत जाऊन पतीने केली पत्नीची हत्या; धक्कादायक कारण समोर

Shengdana Chikki: श्रावणात खास बनवा शेंगदाणा चिक्की, महिनाभर खाता येईल

Raigad To Arnala Fort: रायगड किल्ल्यावरून अर्नाळा किल्ल्यापर्यंत प्रवास कसा कराल? जाणून घ्या प्रमुख टप्पे आणि टिप्स

Nag Panchami 2025: नाग पंचमीला घरी पूजा कशी करावी?

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

SCROLL FOR NEXT