Badlapur minor school girl abuse Saam Tv
महाराष्ट्र

Badlapur News : बदलापूर अत्याचार प्रकरण ; राजकीय नेते काय म्हणतात? वाचा एका क्लिकवर

Badlapur minor school girl abuse case political leaders reaction : बदलापूर अत्याचार प्रकरणी राज्यभरातून संतापाची लाट उठताना दिसत आहे. या घटनेवर राजकीय नेते काय म्हणतात, ते आपण जाणून घेवू या.

Rohini Gudaghe

मुंबई : बदलापूरमधील एका शाळेत चार वर्षाच्या दोन अल्पवयीन चिमुकल्यांवर शाळेतील सफाई कामगाराने अत्याचार केला होता. या घटनेनंतर अख्खं बदलापूर हादरलं होतं. पालकांमध्ये देखील संतापाची लाट आहे. घटनेच्या निषेधार्थ अन् आरोपीला फाशी व्हावी म्हणून, हजारो बदलापूरकर रस्त्यावर उतरले आहेत. नागरिकांचा आक्रमक पवित्रा यावेळी पाहायला मिळतोय, तर आंदोलनकर्त्यांनी रेल रोको देखील केलाय. याप्रकरणी आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, त्या आपण जाणून घेवू या.

बदलापूर अत्याचार प्रकरणी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात आजच चालवला जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपींना कठोर शिक्षा होईल, असं आश्वासन (Badlapur News) दिलंय. बदलापूरमध्ये जे प्रकरण झालं, त्यामध्ये असलेल्या राक्षसी विचारधारेच्या लोकांना भर चौकात आणून फाशी दिली पाहिजे, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केलीय.

बदलापुरातील अत्याचाराची घटना अत्यंत घृणास्पद, क्लेशकारक आणि संतापजनक आहे. मुख्यमंत्र्यांनी ही केस फासस्ट्रॅकवर चालवण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी कारवाईचे आदेश दिले (minor school girl abuse case) आहेत.

शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी बदलापुरात चौकशीसाठी दाखल झाले आहेत. या प्रकरणी संबधित शाळेचे प्रशासन, शिक्षक, आरोपी असो किंवा ज्या पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली, अशा सगळ्यांना क्षमा केली जाणार नाही. या घटनेचे कोणी राजकारण करु नये, कारण यातील पिडीत दोन लहान मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे. यातील नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी एक स्त्री म्हणून मागणी असल्याचं शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत.

कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बदलापूरमधील घटनेवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मागील २ वर्षातील स्वरुप भयानक आहे. खोक्याचं सरकार आहे. राज्याकडे लक्ष नाही, अशी टीका त्यांनी (badlapur news today) केलीय. सखी सावित्री समिती स्थापन केली नसेल तर तेथील अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाणार. हे आदेश संबंधित ब्लॉक ऑफिसरवर कारवाईचे आदेश दिले जातील, असं थोरात यांनी सांगितलंय.

ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोरे म्हणाल्या की, बदलापूरमधील घटना दुर्दैवी आहे. लोकांच्या भावना तीव्र आहेत. या घटनांवर मात करून लवकरात लवकर तपास झाला (badlapur news latest) पाहिजे. कठोर शिक्षा झाली पाहिले, लोकांनी कायदा हाती घेऊ नये, असं आवाहन देखील त्यांनी केलंय. पोलिसांचा वचक राहिला नसल्याची टीका नीलन गोरे यांनी केलीय. तर बदलापूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध केला जातो. अश्या प्रकारच्या लोकांना चिरडून मारायला हवं. कायदा गेला उडत, नराधमाला रस्त्यावर मारायला हवं अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Potato Benefits: महागडे प्रोडक्ट सोडा; चेहऱ्याला लावा बटाटा

Indapur Politics: इंदापुरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का, भावाने दिला विरोधी उमेदवाराला पाठिंबा

Singham Again VS Bhool Bhulaiyaa: सिंघम अगेन की भुल भूलैया 3, तीन दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा टॉप १० मधील 'तगडा' चित्रपट कोणता?

Maharashtra News Live Updates: कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक ; उद्धव ठाकरेंनी दिला कानमंत्र

Shrirampur Vidhan Sabha : श्रीरामपूरमध्ये महायुतीचा पेच कायम; शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांचे अर्ज कायम

SCROLL FOR NEXT