Badlapur News SAAM TV
महाराष्ट्र

Badlapur News : दोन चिमुकल्यांवर अत्याचार करणारा नराधम; बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची सगळी कुंडली, वाचा एका क्लिकवर

Minor school girl abuse case accused Akshay shinde : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचं नाव अक्षय शिंदे असल्याची माहिती मिळतेय. आपण त्याच्याविषयी सविस्तर जाणून घेवू या.

Rohini Gudaghe

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेतील दोन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना १२ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव अक्षय शिंदे असल्याची माहिती मिळतेय. आरोपी त्याच शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत असल्याची माहिती जो एका स्थानिक शाळेचा सफाई कर्मचारी आहे, अशी माहिती लाईव्ह मिंटच्या हवाल्यानुसार मिळत आहे. आपण या अक्षय शिंदेविषयी सविस्तर माहिती जाणून घेवू या.

कोण आहे अक्षय शिंदे?

बदलापूर अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय शिंदे याची पोलीस कोठडी २६ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलीय. पोलिसांनी १७ ऑगस्ट रोजी कथित आरोपीला अटक केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदे नावाच्या तरूणाच्या शाळेच्या शौचालयामध्ये दोन साडेचार वर्षाच्या चिमुकल्या मुलींवर अत्याचार केला होता. हा अक्षय शिंदे कोण आहे? याबद्दल आपण सविस्तर पाहू (Badlapur minor school girl abuse case) या.

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी

एका सफाई कंपनीला कंत्राट देऊन संबंधित शाळेने अक्षय शिंदे (Akshay shinde) याला ऑगस्ट २०१५ मध्ये कामावर घेतलं होतं, असं पोलीस तपासात समोर आले आहे. अक्षयने १४ ऑगस्ट रोजी दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचं उघड झालं. ही धक्कादायक घटना ज्या शाळेत घडली ती, बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. शाळेत मराठी आणि इंग्रजीतून शिक्षण दिले जाते. शाळेतील विद्यार्थी संख्या १२०० च्या आसपास आहे. अक्षय शिंदे २४ वर्षांचा असल्याची माहिती मिळतेय. तो मुंबईपासून ५० किलोमीटर अंतरावर राहत असल्याचं समोर आलंय.

दोषींवर कारवाई होणार...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात होणार असल्याचं जाहीर केलं (Badlapur News) होतं. दरम्यान, शाळेने घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यास विलंब केल्यास दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं सरकारनं म्हटलंय. अनेक पोलिसांना यापूर्वीच निलंबित करण्यात (Badlapur school case) आलंय. याप्रकरणी शाळा दोषी आढळल्यास शाळा प्रशासनावर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. आज मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी तातडीने सुनावणी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला द्या 'या' रंगाचा रत्न, प्रेमात गोडवा वाढेल

Maharashtra Exit Polls: राजुरामध्ये अपक्ष उमेदवार वामनराव चटप होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Exit Polls of Maharashtra : शेकापच्या बालेकिल्ल्यात धनुष्यबाण चालणार? पाहा एक्झिट पोल

पायात काळा धागा का बांधला जातो? जाणून घ्या

Baramati News : अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले फलक; बारामतीत कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

SCROLL FOR NEXT