बदलापूर : एटीएम कार्ड बदलवून फसवणूक केल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. असाच एक प्रकार बदलापूरमध्ये समोर आला असून एटीएम सेंटरचा सुरक्षा रक्षक असल्याचं सांगत एका वृद्धेला तब्बल ४० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी शिताफीने तपास करून दोघांपैकी एकाला ताब्यात घेतले आहे.
वांगणीमध्ये राहणाऱ्या पल्लवी पावसकर या वृद्ध महिला ३० एप्रिलला सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एका बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आल्या होत्या. याचवेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांना (ATM Crime) एटीएमचे वॉचमन असल्याचं सांगत मी तुम्हाला पैसे काढण्यासाठी मदत करतो. असं सांगून त्यांच्याकडून त्यांचं एटीएम कार्ड आणि पिन घेतला. वृद्धेला आवश्यक असलेली रक्कम काढून दिले. त्यानंतर एटीएम कार्डची अदलाबदल करून त्यांना बनावट एटीएम कार्ड दिलं.
सदर वृद्ध महिला तेथून गेल्यानंतर (Badlapur) त्यांच्या खात्यातून तब्बल ४० हजार रुपये त्या दोघांनी काढून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वृद्धेने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी (Police) तपास करत या चोरट्याचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. दिनेश सुरडकर असं या संशयिताचे नाव असून तो उल्हासनगरला राहणारा आहे. तो सराईत चोरटा असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती प्रभारी पोलीस अधिकारी गोविंद पाटील यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.