Ravi Rana on Bacchu Kadu
Ravi Rana on Bacchu Kadu saam tv
महाराष्ट्र

Amravati News: 'बच्चू कडू मंत्रिपदासाठी सरकारला ब्लॅकमेल करतात', रवी राणांनी उडवून दिली खळबळ

Satish Kengar

>> अमर घटारे

Ravi Rana on Bacchu Kadu:

'मला आवर घालण्याचा सल्ला बच्चू कडू यांनी देऊ नये. बच्चू कडू हेच मंत्रिपदासाठी सरकारला ब्लॅकमेल करतात', असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांना आवर घालायला हवी, असं प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू म्हणाले होते. यावर आपली प्रतिकिया देताना रवी राणा असं म्हणाले आहेत.

रवी राणा म्हणाले की, ''देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी गेली ११-१२ वर्षांपासून आहे. ते सरकारमध्ये असताना आणि विपक्षमध्ये असतानाही मी त्यांच्यासोबत होतो. आम्ही दुःखात सुखात सोबत राहणारे व्यक्ती आहोत. पळ काढणारे नाही. बच्चू कडू यांनी जो सल्ला दिला आहे. जे नेहमी पाला बदलत असतात त्यांनी सल्ला देण्याचं काम करू नये.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले की, ''मी प्रत्येक निवडणुकीत पाहत आलोय की, जेव्हा मी निवडणूक लढवतो, तेव्हा सगळे नेते एकत्र येऊन मला पडण्याचा प्रयत्न करतात. मात्र जनता नेहमी माझ्यासोबत राहते.''

रवी राणा पुढे म्हणाले, ''आवर खऱ्या अर्थाने बच्चू कडू यांना घालण्याची गरज आहे. ते ज्या प्रकारे म्हणाले, मला इतके आमदार आणि खासदार लढवायचे आहेत. हे मंत्रीपद हवं ते मंत्रिपद हवं. जे सरकारला ब्लॅकमेल करून काही तरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना आवर घालायला हवी.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO: पराभवानंतर भाजपचा अॅक्शन प्लॅन, अडचणीतील 33 मतदारसंघांसाठी आखली नवीन रणनीती

Lok Sabha Result : लोकसभा निकालात मोठी डील, राऊतांचे गंभीर आरोप

Mannara Chopra : मन्नारा चोप्राचा क्लासी लूक, फॅन्सी अंदाज व्हायरल

Chhagan Bhujbal Special Report : नाराज भुजबळ वेगळी भूमिका घेणार?

Vidhan Sabha BJP Plan : अडचणीतील 33 मतदारसंघासाठी भाजप अलर्ट मोडवर

SCROLL FOR NEXT