Amravati DCC Bank Election Saamtv
महाराष्ट्र

Amravati DCC Bank Election: अमरावती जिल्हा बँक अध्यक्षपदी बच्चू कडू यांचा विजय; आमदार यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का

Amravati News: कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का बसला असून जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आमदार बच्चू कडू यांचा विजय झाला आहे.

Gangappa Pujari

अमर घटारे, प्रतिनिधी...

Amravati DCC Bank Election: सहकार क्षेत्रातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीचा अंतिम निकाल समोर आला आहे. या निवडणूकीत कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का बसला असून जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आमदार बच्चू कडू यांचा विजय झाला आहे. आमदार यशोमती ठाकूर व काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

बच्चू कडू यांनी मारली बाजी...

याबाबत अधिक माहिती अशी की, अमरावती (Amravati) जिल्हा बॅंक निवडणूकीत आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी ऐनवेळी बाजी मारली आहे. निवडणुकीत बच्चू कडू गटातर्फे बच्चू कडू स्वतः अध्यक्षपदासाठी तर सहकारातील नेते अभिजीत ढेपे हे उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात होते. कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख तसेच अ‍ॅड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलकडे पूर्ण बहुमत असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात होता.

कॉंग्रेसची मते फुटली..

मात्र बच्चू कडू व अभिजीत ढेपे या दोघांनाही 11-11 मते मिळाली. तर काँग्रेसच्या यशोमती ठाकुर व बबलू देशमुख गटाचे उमेदवार माजी आ.वीरेंद्र जगताप व हरिभाऊ मोहोळ या दोघांनाही दहा दहा मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेसची तीन मते फुटून बच्चू कडू यांच्याकडे वळल्याने पराभव झाल्याचीही चर्चा होत आहे.

बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया...

"गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांची एक हाती सत्ता होती. शेतकऱ्यांना व संचालकांना त्रास देणाऱ्या हुकूम शहांची हुकूमशाही संपवली व जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या दारी घेऊन जाणार अशी प्रतिक्रिया या विजयानंतर बच्चू कडू यांनी दिली आहे.(Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hyperloop Rail: देशातील पहिली हायपरलूप रेल्वे कधी धावणार? जाणून घ्या, नव्या रेल्वेचा मार्ग

Ration Card Holder: राज्यातील 3 हजार रेशन कार्डधारकांना नाही मिळणार रेशन; काय आहे कारण?

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं; मनोज जरांगे समर्थकांकडून बीड जिल्हा बंदची हाक, VIDEO

EPFO 3.0 लाँन्च होण्यास का होतोय विलंब? कोणत्या पाच नियमात होतील बदल? जाणून संपूर्ण माहिती

Horrific : दुहेरी हत्याकांडाने खळबळ; घरगुती वादातून जावयाने केली मायलेकीची हत्या

SCROLL FOR NEXT