bacchu kadu  Saam tv
महाराष्ट्र

Bacchu Kadu :...तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू; बच्चू कडू असे का म्हणाले?

Bacchu Kadu News : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. येत्या दोन दिवसांत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु न केल्यास पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू, अशा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिली .

Vishal Gangurde

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत व खरेदी केंद्रांच्या विलंबामुळे नांदेडमध्ये तणाव वाढला

माजी मंत्री बच्चू कडू यांनी 21–22 तारखेपर्यंत खरेदी केंद्र सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा

ऐन दिवाळीत शेतकरी आर्थिक संकटात

संजय सूर्यवंंशी, साम टीव्ही

नांदेड : पुरामुळे नुकसान झालेले शेतकरी सरकारच्या आर्थिक मदतीची वाट पाहत आहेत. फडणवीस सरकारनेही दिवाळी आधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे. सरकारच्या आर्थिक मदतीची शेतकऱ्यांना आस लागली आहे. ऐन दिवळील आर्थिक संकटात सापडेल्या शेतकऱ्यांसाठी माजी मंत्री बच्चू कडू धावून आले आहेत. शेतकऱ्यांसाठी 21, 22 तारखेपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू न केल्यास पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू, अशा शब्दात माजी मंत्री बच्चू कडू यांनी इशारा दिला आहे.

बच्चू कडू आज नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं.बच्चू कडू म्हणाले, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही अशा बऱ्याच गोष्टी मी ऐकतो. शेतकऱ्यांचे आयुष्यच अंधारात आहे. दिवाळीचा काय विषय आहे. फडणवीस साहेब म्हणतात, सगळ्यांना एकरी पाच-सहा हजार रुपये देणार आहोत. मला फडणवीस यांना प्रश्न विचारायला पाच-सहा हजारात दिवाळी कशी साजरी होईल'.

'तुमची दिवाळी दोन लाखाचे फटाके फोडून साजरी करतात. शेतकऱ्यांची दिवाळी पाच हजार रुपयात साजरी होईल. थोडी-थोडी लाज वाटली पाहिजे. लाज असेल तर, असली तर वाटेल. महाराष्ट्रात अजूनही सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले नाहीत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सुरू झाले. महाराष्ट्रात का नाही? आमदार, खासदार, पालकमंत्री, अधिकाऱ्यांची मस्त मजा सुरू आहे.

'दिवाळीची सुट्टी काढून सगळे पळाले. कापसाची खरेदी कधी सुरू करणार आहात. सोयाबीनची खरेदी कधी सुरू करणार आहात. पंजाबच्या शेतकऱ्यांचा 90 टक्के शेतीमाल खरेदी होतो. हमीभावात आमचा सहा टक्के पण होत नाही. 21, 22 तारखेपर्यंत खरेदी केंद्र सुरू केले नाही, तर जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांच्या कार्यालयात धिंगाणा केल्याशिवाय राहणार नाही. ते ऑफिस तोडून फोडून टाकू. पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू. खरेदी केंद्र सुरू न केल्याने शेतकरी मरत आहेत. या शेतकऱ्याला मारण्याची व्यवस्था केली आहे. फक्त तलवार चालवलेली दिसत नाही, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डिझेलसाठी 2-4 किमीच्या रांगा; दोन दिवसांपासून पुरवठा ठप्प

SBI Jobs: खुशखबर! स्टेट बँकेत नोकरीची संधी; ८२१ पदांसाठी भरती जाहीर; पगार ₹८०,०००; अर्ज कसा करावा?

Type 2 diabetes: पुरेशी झोप घेऊनही थकवा जात नाही? टाइप 2 डायबिटीजची ही ५ लक्षणं वेळेत ओळखा

Political News : मोठी बातमी! दिल्लीत बड्या नेत्याच्या घरावर ED ची धाड, राजकारणात खळबळ

Lipstick Shades: ग्लॉसी की मॅट? कोणत्या लिपस्टिकने मिळेल ग्लॅमरस आणि परफेक्ट लूक

SCROLL FOR NEXT