Mla Bacchu Kadu  Saam Tv
महाराष्ट्र

Bacchu Kadu on Cabinet Expansion : ...तुम्हाला मंत्रिपदासाठी फोन नाही आला?; बच्चू कडूंची मिश्किल प्रतिक्रिया

Political News : काँग्रेसमधील अनेक नेते सत्तेत येण्यास इच्छुक आहेत, असंही म्हटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Amravati News :  राष्ट्रवादीचा उरलेला गट सत्तेत सहभागी होणार आहे, असा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. काँग्रेसमधील अनेक नेते सत्तेत येण्यास इच्छुक आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. विचारांची अनैसर्गिक युती उद्धव ठाकरे यांनी केली. शेवट आता भाजप करत आहे. मात्र हे लोकांच्या पचनी पडत नाही, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलं की, मंत्रिपदासाठी फोनची वाट अनेकजण पाहतात त्यात काय वावगं? अनेक आमदारांना त्यांच्या पत्नी विचारतात तुम्हाला मंत्री पदांसाठी फोन आला का? तुम्ही तर गुवाहाटीला गेले होते ना, अशी मिश्कील प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

पाच वर्षात कसं राजकारण बदललं हे जनतेनं पाहिलं. सुरुवात उद्धव ठाकरे यांनी केली. विचाराची अनैसर्गिक युती त्यांनी केली. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना असे मुख्यमंत्रिपद त्यांनी तिथे घेतले. आता त्याचा शेवट भाजप करत आहे

सत्ता आणि विचारांमध्ये आता सांगड बसत नाही. विचार बाजूला जाऊन सत्तेकडे जाण्याचा मार्ग नेत्यांनी स्वीकारला आहे असं दिसत आहे. प्रत्येकाला वाटतं मंत्री झालं पाहिजे. मात्र स्वतःच्या मेहनतीवर, लाथ मारिन तिथे पाणी काढण्याची आमची पद्धत आहे. त्यामुळे कुणी दुर्लक्ष करावं की सोबत घ्यावं हा नंतरचा भाग आहे, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

मी नाराज नाही. परीक्षेच्या वेळेवर अभ्यास करणारे काही लोक असतात. काही वर्षभर अभ्यास करणारे असतात. आमचा अभ्यास झाला आहे, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: मालाडमधील छटपूजेच्या आयोजनावरून मनसेचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

Life Hacks : परफेक्ट सकाळ बनवायचीये ? मग ही एक सवय आजच लावा! नाहीतर सकाळी सकाळी होइल प्रचंड धावपळ

SCROLL FOR NEXT